डोंबिवली: काळाचा घाला, छठपूजेसाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

मिथिलेश गुप्ता

• 01:17 PM • 17 Nov 2026

Dimbivali News : डोंबिवलीत मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छठपूजेचा उत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबीयांसोबत तलावावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना डोबिलीतील दावडी परिसरात रविवारी सायंकाळी घडल्याचे वृ्त्त आहे.

Dimbivali news

Dimbivali news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

छठपूजेला तरुणाने तलावात उडी मारली

point

दुर्दैवी घटनेत तरुणाचा अंत

Dimbivali News : डोंबिवलीत मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छठपूजेचा उत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबीयांसोबत तलावावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना डोबिलीतील दावडी परिसरात रविवारी सायंकाळी घडल्याचे वृ्त्त आहे.  तरुणाची जुगनू चौहान (वय 22) अशी ओळख समोर आली. या घडलेल्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांकडूनच शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीला पैशांच्या लाभाचे नवीन मार्ग, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

छठपूजेला तलावात उडी मारून तरुणाचा दुर्दैवी अंत 

घडलेल्या घटनेनुसार, जुगनू चौहान हा रविवारी सायंकाळी बहीण आणि भावासोबत छठपूजा साजरी करण्यासाठी दावडी परिसरातील तलावावर गेला होता. यावेली उत्साहाचे वातावरण होते, याच उत्साहात त्याने तलावात उडी मारली. मात्र, भावांडांनी विरोध करूनही त्याने ऐकले नाही. तलावाच्या खाली पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला होता.

हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. मात्र, छठपूजेनिमित्त मोठ्या प्रामामात गर्दी होण्याची शक्यता असताना घटनास्थळी जीवरक्षक किंवा अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनाक नसल्याची माहिती समोर आली. 

 या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरू केली. मात्र, बराच वेळ जुगनूचा शोध लागत नव्हता. त्यानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तरुणाचा शोध घेण्यासाठी NDRF चे पथक पाचारण करण्याची मागणी केली होती. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : रात्री गारठा अन् सकाळी भलतंच, राज्यात पहिल्यांदाच असं

या दुर्दैवी घटनेनं छठपूजेसारख्या पवित्र मोठ्या धार्मिक उत्सवाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी उपाययोजना, तसेच अपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणाऱ्या यंत्रणेच्या सोयीवर प्रश्न उपस्थित होत आहे.