Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात राज्यात हवामानात चढ-उतार जाणवत आहे. पहाटे काही भागांत अधिक थंडी जाणवू लागली, तर दुपारी उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 ऑक्टोबर रोजी राज्यात बहुतांश भागात कोरड्याच हवामानाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोनिया गांधींच्या रांगेत 'या' नेत्यांना जागा, फोटो व्हायरल
कोकण
कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हवामान कोरडे राहील. समुद्रकिनारी भागांत आर्द्रतेमुळे वातावरणात तुलनेनं अधिकत उबदार जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण थंडीपैकी कोकणात थंडावा कमी जाणवेल. पहाटे आणि मध्यरात्री गारवा जाणवेल, तर दुपारी ऊन कायम असेल.
मध्य महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात पुणे, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर परिसरात पहाटे थंडावा जाणवेल, तर दुपारी उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्यात आकाश निरभ्र राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. पहाटे गारवा जाणवेल, तर दक्षिण महाराष्ट्रात काही भागांत पुढील दोन दिवसांत किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलाय. कोल्हापूर घाटमाथा परिसरात थंडावा अधिक जाणवेल.
मराठवाडा
मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांना कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविलेला आहे, तसेच मध्यरात्री थंडावा आणि दुपारी ऊन जाणवेल अशी शक्यता आहे.
हे ही वाचा : अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांचा नवा गौप्यस्फोट
विदर्भ
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












