ASRB Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाने (ASRB) एकूण 1 हजार 393 पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. केंद्रीय संयुक्त परीक्षा 2026 (Centralized Combined Examination 2026) अंतर्गत टेक्निकल असिस्टंट (T-3) आणि सिनिअर टेक्निकल असिस्टंट (T-4) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष काय?
या भरतीमध्ये टेक्निकल असिस्टंट (T-3) पदाच्या 1 हजार 254 जागा, तर सिनिअर टेक्निकल असिस्टंट (T-4) पदाच्या 139 जागा भरण्यात येणार आहेत. अशा एकूण 1 हजार 393 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी संबंधित विषयातील पदवी किंवा निर्धारित शैक्षणिक पात्रतेनुसार अभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्यामुळे विज्ञान, कृषी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
हे ही वाचा : बंडावेळी शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले, पण त्याच माजी आमदाराने साथ सोडली! कोणत्या पक्षात केला प्रवेश?
पगार किती मिळणार?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. वयाची गणना 17 डिसेंबर 2026 या तारखेनुसार केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना टेक्निकल असिस्टंट (T-3) पदासाठी दरमहा 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये वेतनश्रेणी (लेव्हल 5) मिळणार आहे. तर सिनिअर टेक्निकल असिस्टंट (T-4) पदासाठी 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये वेतनश्रेणी (लेव्हल 6) निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर : कचरा व्यवस्थापनासाठी BMC चा नवा प्लॅन, भरावे लागणार दरमहा 235 रुपये
'असा' करा अर्ज
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 17 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइट (asrb.gov.in) वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी तपासून घ्याव्यात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.
ADVERTISEMENT












