Govt Jobs : भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदांची मेगा भरती, अर्ज कसा करावा?

पृथ्वीराज पाटील

• 07:00 PM • 18 Nov 2026

भारतीय रेल्वेने स्टेशन मास्टर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर असून यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

RRB Recruitment

RRB Recruitment

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

स्टेशन मास्टर पदांसाठी मोठी भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

पगार किती मिळणार?

RRB Recruitment : रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाकडून (Railway Recruitment Board) स्टेशन मास्टर पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1 हजार 265 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष काय?

या भरतीसाठी उमेदवारांचे वय 20 ते 33 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत उमेदवारांचे पदवी शिक्षण पूर्ण झालेले असावे. अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. तसेच स्टेशन मास्टर पदासाठी निर्धारित A-2 वैद्यकीय निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : जिल्हा बँकेच्या सत्तेत भाजप बाहेर? शिवेंद्रराजेंनी सांगितली पडद्यामागची संपूर्ण कहाणी

पगार किती मिळणार

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा 35 हजार 400 रुपये मूळ वेतन मिळणार आहे. हे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्समधील लेव्हल 6 नुसार असेल. याशिवाय रेल्वेच्या नियमानुसार इतर भत्तेही दिले जाणार आहेत. त्यामुळे पदवीधर उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, लवकरच येणार प्रीपेड टॅक्सी

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (CBT), संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना CBT परीक्षेला 70 टक्के, तर CBAT परीक्षेला 30 टक्के महत्त्व दिले जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर असल्याने उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.