Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पाऊस सक्रिय, कुठे मध्यम तर... IMD चा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 15 Sep 2026

Maharashtra Weather : दोन दिवसांत कोकणात गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाने हजेरी लावली आहे. कुठे मध्यम, तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या 15 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather (AI Photo)

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोकणात गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाचा जोर

point

15 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather : राज्यात सध्या पावसाचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने गैरहजेरी लावली होती, मात्र सध्या दोन दिवसांत कोकणात गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाने हजेरी लावली आहे. कुठे मध्यम, तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या 15 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बारामतीत गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार करून खून, गुप्तांगावर जखमा

कोकण 

कोकण विभागात पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तिवण्यात आली आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज राहणार आहे. तर नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.  

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर येथे विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस जाणवण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. जालना, बीड येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार, FIR दाखल

विदर्भ 

अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली. गोंदिया, वाशिम, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात हवामान विभागाने कोणत्याही हवामानाचा अंदाज वर्तविलेला नाही.