Government Jobs : सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) द्वारे 2026 च्या पदभरतीची संक्षिप्त अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एकूण 110 पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार CPRI च्या अधिकृत पोर्टला भेट देऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
'या' पदांसाठी भरती
या भरती प्रक्रियेअंतर्गत इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड-1, इंजिनिअरिंग असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन ग्रेड-1, टेक्निकल अटेंडंट, असिस्टंट ग्रेड-2 आणि मल्टी-टास्क (MTS) अशा विविध प्रकारच्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. विविध श्रेणींमधील पदसंख्येनुसार उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वेतन व भत्ते दिले जातील. देशातील या महत्त्वाच्या संशोधन संस्थेत सेवा बजावण्याची ही उत्तम संधी भरती प्रक्रियेच्या माध्यमातून दिली जात आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर : गणेशभक्तांसाठी 'बेस्ट'चा महत्त्वाचा निर्णय, 'या' मार्गावर चालणार अतिरिक्त बस फेऱ्या
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक अर्हतेचा विचार केला असता, प्रत्येक पदानुसार पात्रता भिन्न ठेवण्यात आली आहे. इंजिनिअरिंग ऑफिसरसाठी संबंधित विषयातील इंजिनिअरिंग पदवी, इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी डिप्लोमा, सायंटिफिक असिस्टंटसाठी सायन्स शाखेची पदवी, तर टेक्निशियन ग्रेड-१ पदासाठी आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच टेक्निकल अटेंडंट, असिस्टंट ग्रेड-2 आणि मल्टी-टास्क स्टाफ (MTS) या पदांसाठी संबंधित विषयात आवश्यक ती पात्रता आणि अनुभव असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हे ही वाचा : 'आम्हाला सविस्तर माहिती द्या..', मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस, नेमकं काय घडलं?
'असा' करा अर्ज
या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून पदानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. सर्व पात्र उमेदवारांनी अर्जाची सविस्तर माहिती, पात्रता निकष आणि इतर अटी जाणून घेण्यासाठी cpri.res.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी आपला अर्ज अचूकपणे सादर करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












