मुंबईची खबर : गणेशभक्तांसाठी 'बेस्ट'चा महत्त्वाचा निर्णय, 'या' मार्गावर चालणार अतिरिक्त बस फेऱ्या

मुंबई तक

गणेशोत्सवाच्या काळात 'बेस्ट'ने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 14 ते 24 सप्टेंबरदरम्यान रात्रीच्या वेळी विशेष जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. यामुळे मुंबईतील भाविकांना दिलासा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गणेशभक्तांसाठी 'बेस्ट'चा महत्त्वाचा निर्णय

point

'या' मार्गावर चालणार अतिरिक्त बस फेऱ्या

Mumbai News : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत दर्शनासाठी होणारी भाविक आणि पर्यटकांची अलोट गर्दी लक्षात घेता 'बेस्ट'ने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी उपलब्ध बसगाड्यांचा पुरेपूर वापर करून अतिरिक्त सेवा पुरवण्यात येत आहे. 14 ते 24 सप्टेंबरदरम्यान रात्रीच्या वेळी विशेष जादा गाड्या सोडण्यात येत असल्याने मुंबईकर भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विविध मार्गांवर विशेष सुविधा

मुंबईतील प्रमुख भागांमध्ये प्रसिद्ध गणपती मंडळांच्या दर्शनासाठी भाविक रात्री उशिरापर्यंत कुटुंबासह हजेरी लावतात. रात्री दर्शन आटोपल्यानंतर सुरक्षित आणि सोयीस्करपणे घरी परतता यावे, यासाठी बेस्टने उत्तर-पश्चिम मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विविध मार्गांवर ही विशेष व्यवस्था केली आहे. या निर्णयामुळे उशिरापर्यंत चालणाऱ्या दर्शन सोहळ्यानंतर प्रवाशांची होणारी वाहतुकीची गैरसोय टाळता येणार आहे.

हे ही वाचा : लातूर: संस्थाचालकाची सुसाईड नोट आली समोर, नेमकं चिठ्ठीत काय?

'या' मार्गांवर चालणार अतिरिक्त बस फेऱ्या

बेस्ट प्रशासनाने रात्रीच्या वेळेत कुलाबा परिसरातून सुटणाऱ्या विविध महत्त्वाच्या मार्गांवर या गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यात प्रामुख्याने मार्ग क्रमांक 54, 78, 121, 129, 142, 144, 151, 162 आणि 169 या मार्गांचा समावेश असून, यावर अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येत आहेत. विशेषतः गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने या सर्व मार्गांवर विशेष भर दिला जात आहे.

हे ही वाचा : 'आम्हाला सविस्तर माहिती द्या..', मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस, नेमकं काय घडलं?

भाविकांचा प्रवास सुखकर

गणेशोत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी प्रवासाचा कोणताही खोळंबा न होता भाविकांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास करता यावा, हा याचा मुख्य उद्देश आहे. बेस्टच्या या तत्पर आणि नियोजनबद्ध सेवेमुळे रात्रीच्या वेळी मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या या अतिरिक्त गाड्यांमुळे भाविकांचा प्रवास अत्यंत सुखकर होणार आहे.