बायकोवर अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने पत्नीवर हल्ला करत धडापासून वेगळं केलं डोकं
Crime News : मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आरोपीने परवेजने झोपलेली पत्नी नगमाच्या मानेवर चाकूने वार केले आणि तिची हत्या केली. हल्ला इतका जोराचा होता की, पीडित पत्नी नगमा (वय 30) हिची हत्या करण्यात आली होती. अनैतिक प्रेमसंबंधातून हा प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फोनवर बोलण्यावरून पती-पत्नीत वाद
अनैतिक प्रेमसंबंधातून प्रकरण उघडकीस
नवऱ्याने पत्नीचे डोके शरीरापासून केले वेगळे
Crime News : उत्तर प्रदेशातील हरदोईच्या कोतवाली शहर पोलीस ठाण्याच्या इस्लामनगर टिलिया परिसरात बुधवारी धक्कादायक प्रकार घडला होता. मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आरोपीने परवेजने झोपलेली पत्नी नगमाच्या मानेवर चाकूने वार केले आणि तिची हत्या केली. हल्ला इतका जोराचा होता की, पीडित पत्नी नगमा (वय 30) हिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. अवध प्रेमसंबंधातून हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे ही वाचा : लातूर: संस्थाचालकाची सुसाईड नोट आली समोर, नेमकं चिठ्ठीत काय?
फोनवर बोलण्यावरून पती-पत्नीत वाद
नगमा आणि परवेज यांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. कुटुंबात वाटणी झाल्यानंतर ते एकत्रित कुटुंबापासून खाजगी कुटुंबात राहू लागली. परवेजने आपल्या वाट्याला आलेले घर विकले आणि तो एका भाडेतत्त्वाच्या घरात राहत होता. उपजीविकेसाठी परवेज हा टॅक्सी चालवत होता. दोघांमध्ये फोनवर बोलण्यावरून वाद निर्माण झाला होता.
नगमाचं डोकं शरीरापासून वेगळं
बुधवारी रात्री उशिरा आरोपीने खून केल्यानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना खूनाची माहिती दिली. पोलिसांनी घटना ऐकल्यानंतर ते देखील हादरून गेले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, नगमाचे डोके हे शरीरापासून वेगळे झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.
हे ही वाचा : लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन
अनैतिक प्रेमसंबंधातून प्रकरण उघडकीस
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुबोध गौतम यांनी ही घटना प्राथमिकदृष्ट्या प्रेमसंबंधातून समोर आल्याचे सांगितले. कौटुंबिक वादातून घडल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणात मृतक महिलेची बहीण शब्बोने केलेल्या आरोपावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे.
