मित्राचे घरातील महिलेशी अनैतिक संबंध, प्लॅन बनवला अन् केला भयानक शेवट
वृंदावनमधील एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. घरातील महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरुन ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मित्राचे घरातील महिलेशी अनैतिक संबंध
प्लॅन बनवला अन् केला भयानक शेवट
Crime News : एका बांधकामाधीन इमारतीमध्ये सुताराचा झालेला संशयास्पद मृत्यू हा अपघात नसून हत्याच असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा यशस्वी उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत सुताराच्याच सहकाऱ्याला अटक केली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून आणि रागातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. वृंदावन येथील चैतन्य विहार फेज-२ मधील ही घटना आहे.
शेजाऱ्यावर संशय
वृंदावन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव कुमार उर्फ पप्पू या सुताराचा मृतदेह गुरुवारी (10 सप्टेंबर) सकाळी आढळला होता. याप्रकरणी त्याचा शेजारी आणि कछपुरा येथील रहिवासी कन्हैया याच्यावर संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येच्या घटनेनंतर फरार झालेला आरोपी शुक्रवारी रात्री वृंदावनमधील पाणीगाव रोडवरील हेलिपॅडसमोर फिरताना आढळला.
हे ही वाचा : भेट घेऊन तक्रार केली..,अन् झटक्यात पीएम मोदींच्या वर्गमित्राला जमीन परत मिळाली, नरेंद्र मेहतांचा मोठा निर्णय!
मोबाईल हस्तगत
संशयित आरोपी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घेराबंदी करून कन्हैयाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मृत संजीव कुमारचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
हे ही वाचा : ठाकरेंचा 'तो' अधिकार शिंदेंना खुपला, आयोगानेही नाकारला! सुप्रीम कोर्टात मोठा मुद्दा
कुटुंबातील महिलेशी अनैतिक संबंध
पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याच्या कुटुंबातील एका महिलेसोबत संजीवचे अनैतिक संबंध होते. त्याला अनेकदा समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्याला संपवण्याच्या उद्देशाने आरोपी त्याच्यासोबत कामाच्या बहाण्याने वृंदावनला आला होता आणि बुधवारी रात्री संधी साधून त्याची हत्या केली. आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
