विवाहित एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या सरपंचाच्या मुलाची हत्या
Crime News : विवाहित एक्स गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या ग्राम प्रधानाच्या मुलाची वीटांनी ठेचून हत्या करण्यात आली. रायबरेलीतील या प्रकरणात महिलेचा पती आणि त्याच्या साथीदारासह तिघांना पोलिसांनी अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विवाहित एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या सरपंचाच्या मुलाची हत्या
विवाहित एक्सला भेटायला गेला अन् जीव गमावला
Crime News : विवाहित एक्स गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या सरपंचाच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. रमाकांत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सरपंच गणेश प्रसाद यांचा मुलगा होता. रमाकांतचे काही काळापूर्वी सोनीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. या प्रेम प्रकरणावरुन वाद सुरु होता. शनिवारी रमाकांत सोनीला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी सोनीचा पती सुरेंद्र तिथे आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हल्ल्यात झाले. सोनी, सुरेंद्र आणि त्यांचा साथीदार वीरेंद्र यांनी मिळून रमाकांतवर हल्ला केला. या हल्ल्यात रमाकांतचा मृत्यू झाला.
रमाकांतची वीटांनी ठेचून क्रूर हत्या
घटनेनंतर या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत रमाकांत रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसत आहे. घटनास्थळी काही ग्रामस्थ उपस्थित होते. ते एका महिला आणि एका तरुणाला सतत प्रश्न विचारताना दिसत आहेत. व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणाची ओळख सुरेंद्र अशी झाली. तर महिलेची ओळख सोनी अशी झाली. रमाकांतने महिलेला बराच काळ त्रास दिल्याचा आरोप आरोपींनी केला. याबाबत पोलिसांकडे तीन वेळा तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी पोलिसांकडे तक्रार आली होती. त्यावेळी आपसात समझोता झाल्याचे सांगण्यात आले.
प्रेमसंबंध तुटलेले असताना भेटायला गेला अन् जीव गमावला
ही घटना उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील बछरावां पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खैरहनी गावात घडली. खैरहनी हे छतैया ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. या ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश प्रसाद आहेत. त्यांचा मुलगा रमाकांत शनिवारी सोनीला भेटण्यासाठी खैरहनी येथे पोहोचला होता. त्यानंतर सुरेंद्र तिथे आला. दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी सोनी, सुरेंद्र आणि वीरेंद्र यांनी मिळून रमाकांतवर वीटांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रमाकांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोनीचा 2010 मध्ये अमितसोबत विवाह झाला होता. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सोनी आणि रमाकांत यांच्यात जवळीक वाढली. पुढे सोनीने सुरेंद्रसोबत लग्न केले. मात्र, रमाकांत आणि सोनीच्या पूर्वीच्या संबंधांवरून वाद सुरू होता. याच वादातून ही घटना घडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात सोनी, तिचा पती सुरेंद्र आणि त्यांचा साथीदार वीरेंद्र यांना अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयीन प्रक्रियेनंतर जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.
