Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी, अर्ज कसा कराल?

मुंबई तक

• 04:27 PM • 19 Sep 2026

भारतीय तटरक्षक दलात भरती सुरु झाली आहे. यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे, जाणून घ्या सविस्तर.

Indian Coast Guard Recruitment

Indian Coast Guard Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

point

अर्ज कसा कराल?

Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) 'फोरमन ऑफ स्टोअर्स' या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण 4 रिक्त जागा भरल्या जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना कारवार, मिनिकॉय, पिपावाव आणि भुवनेश्वर येथे नियुक्ती दिली जाईल. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 19 सप्टेंबर पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना 3 नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज पाठवता येतील. देशाच्या संरक्षण सेवेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार, उमेदवाराकडे अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, बिझनेस स्टडीज किंवा लोकप्रशासन यापैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी (Master's Degree) आणि स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव असावा. किंवा, उमेदवाराकडे याच विषयांत पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग इत्यादींमध्ये डिप्लोमा आणि सोबत दोन वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने सपासप वार करून संपवलं

वेतन किती मिळणार?

'फोरमन ऑफ स्टोअर्स' हे गट 'ब' (Group B) मधील अराजपत्रित पद असून यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार 'लेव्हल 6' चे उत्तम वेतन दिले जाईल. या पदासाठी उमेदवारांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम आलेल्या अर्जांची योग्य छाननी केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील आणि शेवटी लेखी परीक्षा घेऊन उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

हे ही वाचा : "दारावरची टकटक..", केंद्र सरकारच्या UPI निर्णयाबाबत राज ठाकरेंची सूचक पोस्ट

अर्ज कुठे कराल?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुकांनी आपला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह सामान्य टपालाने (Ordinary Post) 'द डायरेक्टर जनरल, फॉर पीडी (रिक्रूटमेंट), कोस्ट गार्ड हेडक्वार्टर्स, डायरेक्टोरेट ऑफ रिक्रूटमेंट, सी-1, फेज II, इंडस्ट्रियल एरिया, सेक्टर 62, नोएडा, उत्तर प्रदेश – 201309' या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी indiancoastguard.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.