"दारावरची टकटक..", केंद्र सरकारच्या UPI निर्णयाबाबत राज ठाकरेंची सूचक पोस्ट

मुंबई तक

Raj thackeray : केंद्र सरकारने युपीआय पेमेंटबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. 15 ऑक्टोबरपासून आता युपीआय पेमेंटला देखील एमडीआर लावण्यात येणार आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत सरकारच्या या निर्णयाचा समाचार घेतला आहे.

ADVERTISEMENT

Raj thackeray on merchant discount rate
Raj thackeray on merchant discount rate
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दारावरची टकटक !...

point

केंद्र सरकारने युपीआय पेमेंटबाबत घेतल्या निर्णयाबाबत राज ठाकरेंच ट्विट

Raj thackeray : केंद्र सरकारने युपीआय पेमेंटबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. 15 ऑक्टोबरपासून आता युपीआय पेमेंटला देखील एमडीआर लावण्यात येणार आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत सरकारच्या या निर्णयाचा समाचार घेतला आहे. पोस्ट लिहिण्याची सुरूवात त्यांनी 'दरवाजावरची टकटक' अशी केली आहे. 'दरवाजावरची टकटक' अर्थातच सामान्यांसाठी गंभीर इशारा अशा अर्थाने त्यांनी म्हटलं आहे. सरकारच्या या निर्णयाला राज ठाकरे यांनी भारतीयांवर डिजिटल सापळा लावला असल्याचं म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने सपासप वार करून संपवलं

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी 

दारावरची टकटक !

केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर 'मर्चंट डिस्काउंट रेट' अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, 'डिजिटल सापळा' लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत युपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकलं की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवलं आणि हळूच 'डिजिटल सापळ्यात' पकडलं. मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळं किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार. आणि त्याची सुरुवात झाली आहे. 

सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असं बघितलं आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करणं इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली?