Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे, तर काही भागांना हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 22 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSI विजय सांगडे यांचे निधन, ड्युटीवर जाण्यापूर्वी कुटुंबीयांना सांगितली 'ती' गोष्ट
कोकण
कोकण विभागात पालघर जिल्ह्यात विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि जळगाव येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर जळगाव जिल्ह्यात विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगरात विजांसह हलका ते मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
हे ही वाचा : गणपती मूर्तीच्या पायाशी अश्लील Video चा QR स्कॅनर, भयंकर कृत्याने मोठी खळबळ
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. वाशिम आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणात्याही अलर्टची शक्यता वर्तविली नाही. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT












