सातारा : कामगाराची आगीच्या भट्टीत उडी घेऊन आत्महत्या, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

• 09:24 AM • 19 Jul 2026

साताऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील एका कामगाराने चालू आगीच्या भट्टीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

Satara Suicide

Satara Suicide

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सातारा : कामगाराची आगीच्या भट्टीत उडी घेऊन आत्महत्या

point

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Satara Suicide : सातारा जिल्ह्यातील वाई येथील एमआयडीसी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील एका फॅक्टरीत कार्यरत असलेल्या एका परप्रांतीय कामगाराने चालू आगीच्या भट्टीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेचा आणि मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

नैराश्यातून उचलले पाऊल

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव दुर्गा रोधा प्रधान असे असून, तो मूळचा झारखंड राज्यातील राजाबासा येथील रहिवासी होता. वाई एमआयडीसीमधील संबंधित कंपनीत तो गेल्या काही काळापासून काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून दुर्गा याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितले. याच मानसिक तणावातून किंवा नैराश्यातून त्याने हे भयानक पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

हे ही वाचा : सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल

विशेष म्हणजे, या संपूर्ण आत्महत्येचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कंपनी प्रशासनात एकच गोंधळ उडाला. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी याच कंपनीमध्ये अशीच एक आत्महत्येची घटना घडली असल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे एकाच कंपनीत लागोपाठ घडलेल्या या घटनांबद्दल आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाचा जामीन रद्द, हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना दणका

पोलीस तपास काय सांगतो?

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित कामगाराने हे पाऊल नक्की कोणत्या कारणांमुळे उचलले, तसेच कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात होती की नाही, या सर्व बाजूंचा वाई पोलीस कसून तपास करत आहेत.