Maharashtra Weather : जुलै महिन्यात अपेक्षित मान्सून असणं गरजेचं आहे. मात्र, वास्तवात मान्सून गायब झाल्याचं चित्र होतं. पण आता राज्यातील कोकणासह काही ठिकाणी मान्सूनची शक्यता दिसत आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही भागांत पावसाचा अलर्ट वर्तवला असला तरीही प्रत्यक्षात पाऊस पडताना दिसत नाही, अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तरुणाने महिला कॉन्स्टेबलला गुप्तांग दाखवलं, डिलिव्हरी बॉयला दाखवला इंगा
कोकण
कोकणातील पालघर, मुंबई या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे. तर ठाणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाजाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम आणि जळगावमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे आणि सांगली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सातारा आणि सोलापूरमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज असून 30 ते 40 वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. हिंगोलीत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
हे ही वाचा : पुणे: शिक्षकाकडून नववीतील मुलीचा छळ, नको तिथेच स्पर्श केल्याचा पीडितेचा आरोप
विदर्भ
भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह 40-50 किमी वेगाने सोसायट्यांचा वारा वाहण्याची अधिक शक्यता आहे. नागपूर, वर्धा, वाशिम, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत 40-50 किमी वेगाने सोसायट्यांचा वारा वाहण्याची शक्यता आहे. या एकूण जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात कोणताही अलर्ट जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT












