Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याचं चित्र आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही विभागांत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज दिलेला आहे. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज, पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पालघरमध्ये खाकी वर्दीला बट्टा, 56 वर्षीय पोलिसाचा 13 वर्षीय मुलीवर विनयभंग
कोकण
पालघर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड या दोन जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. मुंबई आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर परिसरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, आणि जालना या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलका पाऊस राहणार आहे.
हे ही वाचा : जालना: मुलगा अंध जन्मल्याचा राग, नवऱ्यासह सासूने दोघांना विहिरीत फेकलं
विदर्भ
विदर्भातील भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, वाशिम, नांदेड आणि नागपूर या जिल्ह्यांत कोणताही अलर्ट वर्तवलेला.
ADVERTISEMENT












