मुंबई: रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड (RBNL) ने आज आपल्या नव्या एकात्मिक मीडिया आणि मनोरंजन परिसंस्थेची – ONE BIG WORLD – घोषणा केली. प्रतिष्ठित BIG FM च्या मजबूत वारशावर आधारित हा उपक्रम कंपनीच्या विकासप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यासह RBNL स्वतंत्र मीडिया व्यवसायांपलीकडे जाऊन अशा सर्वसमावेशक परिसंस्थेमध्ये रूपांतरित होत आहे, जी ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक डिजिटल आणि भौतिक टचपॉइंटवर जोडण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ONE BIG WORLD चे संचालन नोएडा येथे उभारल्या जाणाऱ्या ६०,००० चौरस फूटांच्या अत्याधुनिक सुविधेतून केले जाईल.
ADVERTISEMENT
सध्या ONE BIG WORLD दरमहा ५०० दशलक्षांहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचते. या परिसंस्थेमध्ये ६७ BIG FM रेडिओ स्टेशन, BIG News Network, १०० दशलक्षांहून अधिक लाइफटाइम युजर्स असलेले BIG LIVE, सोशल मीडियावरील २० दशलक्षांहून अधिक पोहोच आणि ७५ पेक्षा अधिक शहरांमध्ये स्थापित ५,००० हून अधिक BIG DOOH ट्रान्झिट स्क्रीन्स यांचा समावेश आहे. याशिवाय BIG FM One, BIG Experiences आणि BIG Vibe या नव्या उपक्रमांच्या माध्यमातून कंपनी हायपरलोकल, प्रादेशिक डिजिटल आणि अनुभवात्मक (Experiential) क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहे.
ONE BIG WORLD हे केवळ एक मीडिया प्लॅटफॉर्म नसून एका नव्या विचारसरणीचे प्रतीक आहे. कंटेंट, वितरण, प्रेक्षक आणि ब्रँड अनुभव यांच्यातील पारंपरिक सीमा दूर करून ग्राहकांचा अधिक सखोल सहभाग, समुदायनिर्मिती, कॉमर्स आणि जाहिरातदारांसाठी मोजता येणारे व्यावसायिक परिणाम साध्य करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे एकात्मिक मल्टी-प्लॅटफॉर्म नेटवर्क आहे.
या प्रसंगी साहिल मंगला, चेअरमन, RBNL म्हणाले, "गेल्या दोन दशकांमध्ये BIG FM ने भारतीय श्रोत्यांसोबत विश्वास, स्थानिक नाळ आणि भावनिक नाते निर्माण केले आहे. बदलत्या ग्राहकांच्या सवयी आणि नॉन-लिनिअर ग्राहक प्रवास लक्षात घेऊन ONE BIG WORLD ही आमची धोरणात्मक पुढाकार आहे. यामुळे Reliance Broadcast केवळ रेडिओ प्रसारक न राहता ग्राहकांचा विश्वासार्ह दैनंदिन साथीदार बनत आहे, जिथे रेडिओ, बातम्या, डिजिटल, DOOH आणि लाइव्ह अनुभव हे AI-सक्षम, एकात्मिक मीडिया आणि मनोरंजन परिसंस्थेचा भाग म्हणून एकत्र येतात. प्रतिष्ठित गुंतवणूकदार आणि आघाडीच्या उद्योग समूहांच्या सहकार्याने आम्ही भारतातील सर्वात प्रगत, विश्वासार्ह आणि एकात्मिक मीडिया पॉवरहाऊस उभारण्याच्या दिशेने एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहोत."
अशित कुकियन, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), RBNL म्हणाले, "ONE BIG WORLD च्या माध्यमातून आम्ही ग्राहक आणि जाहिरातदार दोघांसाठीही नव्या संधी निर्माण करत आहोत. आता ब्रँड्सना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विखुरलेल्या मोहिमांची गरज भासणार नाही. कंटेंट निर्मितीपासून मल्टी-चॅनेल वितरणापर्यंत तसेच रेडिओ, बातम्या, डिजिटल, DOOH आणि अनुभवात्मक प्लॅटफॉर्मवरील ऑन-ग्राउंड अॅक्टिव्हेशन्सपर्यंत सर्व सेवा आम्ही एका एकात्मिक व्यासपीठावर उपलब्ध करून देत आहोत. हे मॉडेल अधिक प्रभावी ग्राहक सहभाग, व्यापक पोहोच आणि प्रत्यक्ष व्यावसायिक परिणाम सुनिश्चित करते."
ONE BIG WORLD तीन धोरणात्मक स्तंभांवर आधारित आहे:
1. मुख्य आधारस्तंभ
BIG FM – भारतातील सर्वात मोठे Brand FM Network. ६७ स्टेशनच्या माध्यमातून ३४० दशलक्षांहून अधिक श्रोते, १,९०० पेक्षा अधिक शहरे व गावे आणि २ लाखांहून अधिक गावांपर्यंत पोहोच. सांस्कृतिक आणि भावनिक नाळ अधिक मजबूत करताना आता VRJs (Video Radio Jockeys) च्या माध्यमातून डिजिटल-प्रथम व्हिडिओ कंटेंटमध्येही विस्तार.
BIG News Network – सोशल आणि डिजिटल-प्रथम ब्रॉडकास्ट न्यूज प्लॅटफॉर्म, जो वेगवान, विश्वासार्ह आणि प्रभावी बातम्या देईल. यावर्षी अनेक प्रादेशिक वृत्तवाहिन्या आणि स्वतंत्र बिझनेस न्यूज चॅनल सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
BIG DOOH – ५,००० हून अधिक प्रीमियम ट्रान्झिट स्क्रीन्सचे डिजिटल आउट-ऑफ-होम (DOOH) नेटवर्क, जे प्रोग्रामॅटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक प्रभावी आणि मोजता येणारी जाहिरात समाधान उपलब्ध करून देण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
2. डिजिटल आणि प्रॉडक्ट फ्रंटियर्स
BIG FM ONE – AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म. ग्राहकांच्या अधूनमधून ऐकण्याच्या सवयीला दैनंदिन वापरात रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट. यामध्ये प्रादेशिक भाषा, हायपरलोकल कंटेंट, विषयनिहाय कंटेंट, शॉर्ट आणि लाँग-फॉर्म ऑडिओ-व्हिडिओ, कम्युनिटी प्लॅटफॉर्म्स, इंटरअॅक्टिव्ह फॉरमॅट्स, बुद्धिमान वैयक्तिकरण, एकात्मिक कॉमर्स आणि जागतिक स्ट्रीमिंग यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना समाविष्ट आहेत.
BIG LIVE – RBNL चे स्थापित डिजिटल एंगेजमेंट प्लॅटफॉर्म, ज्याचे १०० दशलक्षांहून अधिक लाइफटाइम युजर्स आहेत. Ask RJ आणि BIG FM चे पंडितजी यांसारख्या लोकप्रिय इंटरअॅक्टिव्ह फॉरमॅट्सद्वारे ग्राहकांशी सातत्यपूर्ण संवाद साधला जातो.
BIG Social Connect – २० दशलक्षांहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोच असलेले सोशल मीडिया नेटवर्क. विविध विषय आणि श्रेणींमध्ये १०० हून अधिक नव्या सोशल हँडल्सद्वारे याचा विस्तार केला जाणार आहे.
3. अनुभवात्मक आणि लाइव्ह वर्टिकल्स
BIG Vibe – तरुण प्रेक्षकांसाठी विकसित केलेले उच्च-वारंवारतेचे लाइव्ह मनोरंजन वर्टिकल, जे नाइटलाइफ, कलाकारांचे दौरे आणि प्रीमियम व्हेन्यू भागीदारीवर लक्ष केंद्रित करते.
BIG Concerts & IPs – Papon, Javed Ali, Harshdeep Kaur आणि Salman Ali यांच्या यशस्वी कॉन्सर्ट्सच्या वारशाला पुढे नेत बहु-शहर कलाकार दौरे, पुरस्कार सोहळे (BIG Impact Awards, BIG Marathi Entertainment Awards), एक्स्पो, कार्निव्हल, कॉन्क्लेव्ह आणि उत्सव (BIG Dream Makers, BIG Auto Expo, BIG Family Fest इत्यादी) यांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करणार आहे.
BIG Experiences – MICE आणि Enterprise Experiential Solutions वर केंद्रित विशेष वर्टिकल, जे उच्च-मूल्य IP निर्मिती, मोठ्या प्रमाणावरील ब्रँड लॉन्च आणि धोरणात्मक कॉर्पोरेट सहभाग नव्या उंचीवर नेईल.
आज ग्राहक विविध प्लॅटफॉर्मवर कंटेंटचा उपभोग घेत आहेत आणि जाहिरातदार व्यापक पोहोच, अधिक सुसंगतता आणि ठोस परिणाम देणाऱ्या एकात्मिक भागीदारांच्या शोधात आहेत. अशा पार्श्वभूमीवर ONE BIG WORLD आपल्या भक्कम विस्तार आराखड्याच्या, सातत्यपूर्ण वाढीच्या आणि भविष्याभिमुख दृष्टिकोनाच्या बळावर भारतातील सर्वात व्यापक, भविष्यसज्ज आणि नवोन्मेषप्रधान मीडिया आणि मनोरंजन परिसंस्था उभारण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
About Reliance Broadcast Network Limited
Reliance Broadcast Network Limited (RBNL), a wholly owned subsidiary of Sapphire Media Limited, is a leading content and technology-oriented media and entertainment company. Through its ONE BIG WORLD ecosystem, RBNL integrates BIG FM, BIG News Network, BIG DOOH, BIG LIVE, BIG FM One, BIG Experiences, and BIG Vibe to create meaningful, data-driven connections between audiences and brands. RBNL has been consistently recognized at prestigious platforms including the ABBYS, E4M Golden Mikes, ACEF and India Radio Forum.
ADVERTISEMENT












