जळगाव : 7 जुलैला लग्न, 13 जुलैला मृत्यू; पोलीस पत्नीसोबत काय घडलं?

मुंबई तक

14 Jul 2026 (अपडेटेड: 14 Jul 2026, 10:00 AM)

Jalgaon newlywed vaishali patil dies : लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांत जळगावातील नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू झाला. भरधाव चारचाकीच्या धडकेत वैशाली पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Jalgaon newlywed vaishali patil dies

Jalgaon newlywed vaishali patil dies

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जळगाव : 7 जुलैला लग्न, 13 जुलैला मृत्यू;

point

पोलीस पत्नीसोबत काय घडलं?

Jalgaon newlywed vaishali patil dies : सात जुलैला लग्नगाठ बांधली आणि अवघ्या सहा दिवसांनी तेरा जुलैला मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना जळगाव शहरात घडली. लग्नाच्या आनंदावर काही दिवसांतच दु:खाची काळी छाया पसरली असून भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 21 वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात जळगाव शहरातील विद्यापीठासमोरील रस्त्यावर घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : दुधातील भेसळ कशी ओखळाल? काय पाहायचं? तुकाराम मुंडेंचा महत्त्वाचा सल्ला

दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा

वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदाम्पत्य देवदर्शनासाठी गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. नव्या आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच घडलेल्या या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : Exclusive: ...तर थेट जन्मठेप! तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा, दूधात भेसळ करायचा विचार विसरून जा!

चारचाकी वाहनाने वैशालीच्या दुचाकीला जोरदार धडक

सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास ते विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या गंभीर दुखापतीमुळे वैशाली पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत त्यांचे काका प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या आनंदाचे वातावरण काही दिवसांतच शोकात बदलल्याने या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.