भयंकर! चिमुकली शाळेत जाण्यासाठी थांबली, 6 भटके कुत्रे आले अन्..VIDEO

मुंबई तक

17 Jul 2026 (अपडेटेड: 17 Jul 2026, 12:32 PM)

gondia stray dog attack : गोंदियात शाळेत जाण्यासाठी घराबाहेर उभ्या असलेल्या सात वर्षीय चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केला. शेजारील महिलेच्या धाडसी कृतीमुळे मुलीचा जीव वाचला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

gondia stray dog attack

gondia stray dog attack

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भयंकर! चिमुकली शाळेत जाण्यासाठी थांबली,

point

6 भटके कुत्रे आले अन्..VIDEO

gondia stray dog attack : गोंदिया शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील रिंग रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर उभी असलेल्या सात वर्षीय चिमुरडीवर अचानक भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केला. शाळेसाठी तयार झालेली ही मुलगी घरासमोर उभी असतानाच गल्लीतील अनेक आक्रमक कुत्र्यांनी तिला घेरले आणि तिच्यावर झडप घातली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या चिमुरडीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : काल जयंत पाटील अन् आव्हाडांनी भेट घेतली, अन् आज शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द

कुत्र्यांच्या झुंडीला महिलेने पळवून लावले

चिमुरडीच्या किंकाळ्या ऐकताच शेजारी राहणारी एक महिला तातडीने घटनास्थळी धावून आली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने मोठ्या धाडसाने आणि प्रसंगावधान राखत आवाज करत तसेच दगडांच्या मदतीने आक्रमक कुत्र्यांच्या झुंडीला तेथून पळवून लावले. महिलेच्या वेळेवर केलेल्या या धाडसी हस्तक्षेपामुळे चिमुरडीचा जीव वाचला. मात्र, या भीषण प्रसंगामुळे ती प्रचंड घाबरली असून तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : तुम्ही विचारही करू शकत नाही एवढं विचित्र राजकारण, NCP च्या विचित्र संघर्षाची भन्नाट Inside Story

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण 

या घटनेमुळे गोंदिया शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीबाबत नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या झुंडी मुक्तपणे फिरत असल्याने पायी जाणारे नागरिक, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक तसेच घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत अशा कुत्र्यांचा वावर अधिक असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची तातडीने धरपकड करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सात वर्षीय चिमुरडीवर झालेल्या हल्ल्याची आणि तिचा जीव शेजारील महिलेच्या धाडसी कृतीमुळे वाचल्याची घटना शहरभर चर्चेचा विषय ठरली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे या घटनेची गंभीरताही अधोरेखित झाली आहे.