Mumbai Police Viral Video : मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जवरुन ठाकरे बंधूंनी संताप व्यक्त केला. तसेच 26 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी एका पोलिसाच्या कथित व्हिडीओविषयी भाष्य केले. तो व्हिडिओ नेमका काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
व्हिडीओ नेमका काय?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा कथित व्हिडीओ मुंबईतील असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेतल्याचं दिसून येतं. यावेळी एक पोलीस त्या मुलांशी बोलत आहे. तो पोलीस या व्हिडिओत हिंदीत बोलताना दिसून येत आहे. मुलांना उद्देश्यून तो म्हणतो की, 'नंतर कुठं सापडलात तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. मी थेट 50-50 ग्रॅम पावडर टाकीन खिशात. यानंतर आयुष्य गेलं. जामीन नाही.'
हे ही वाचा : पोलिसांकडून खोट्या ड्रग्सप्रकरणी अडकवण्याची मुलाला धमकी, 'त्या' व्हिडिओवर राज ठाकरेंचा संताप
राज ठाकरे काय म्हणाले?
या कथित व्हिडीओविषयी राज ठाकरे म्हणाले की, 'माझ्याकडे नुकताच एक व्हिडिओ आलेला आहे. एका पोलिसांच्या गाडीत मुले होती, त्या मुलांना पोलीस म्हणतात की, जर या परिसरात दिसलात तर खिशात 50 ग्रॅमची पाऊडर टाकेन. आता पाऊडर पण मिळायला लागली का? हा पोलीस कोण ड्रग्स सप्लायर्स आहे का? हे काय सुरूये मला कळत नाहीये.'
हे ही वाचा : 'तो' प्रश्न विचारताच आण्णा हजारे मुंबई Tak च्या मुलाखतीतून उठून गेले...
चौकशीचे आदेश
हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. याविषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पोस्ट केली आहे. हे कृत्य अतिशय विकृत, तितकेच निषेधार्ह आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारे असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि वस्तुस्थितीची खातरजमा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT












