मुंबईसह राज्यात पाऊस घालणार थैमान, कुठे रेड; तर कुठे यलो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 23 Jul 2026

Maharashtra Weather : जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने मुंबईसह राज्यात हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी ऑरेंज, तर काही भागांत ऑरेंज अलर्टचा पावसाने अंदाज वर्तवलेला होता. अशातच आता 23 जुलै 2026 रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.  

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईसह राज्यात मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता

point

कुठे रेड तर कुठे यलो अलर्टचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपूर्वी मान्सून गायब झाल्याचं चित्र होतं, मात्र दोन दिवसांपासून मान्सूनने हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने मुंबईसह राज्यात मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी ऑरेंज, तर काही भागांत ऑरेंज अलर्टचा पावसाने अंदाज वर्तवलेला होता. दरम्यान, 23 जुलै 2026 रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : औरंगाबादमध्ये 20 वर्षीय नेपाळच्या महिलेवर अत्याचार, घटनेनं परिसर हादरला

कोकण 

कोकण विभागात पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. अशातच मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. 23 जुलै रोजी कोकणात पावसाची शक्यता असणार आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा येथे ऑरेंज अलर्टची शक्यता असून अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्टचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सातारा घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. 

हे ही वाचा : नवऱ्याला दारूसाठी पैसे देण्यास नकार, बायकोची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला

विदर्भ 

विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या एकूणच जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.