औरंगाबादमध्ये 20 वर्षीय नेपाळच्या महिलेवर अत्याचार, घटनेनं परिसर हादरला

मुंबई तक

Crime News : औरंगाबाद येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 वर्षीय नेपाळच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून पीडितेनं आपल्या नवऱ्याला या घटनेची माहिती दिली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याचं आमिष दाखवलं 

point

पीडितेवर खोलीत जबरदस्ती लैंगिक अत्याचार

Crime News : बिहारच्या औरंगाबाद येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 वर्षीय नेपाळच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून पीडितेनं आपल्या नवऱ्याला या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर पती आपल्या पीडित बायकोसोबत पोलीस ठाण्यात गेला होता, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : नवऱ्याला दारूसाठी पैसे देण्यास नकार, बायकोची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला

पीडितेनं या घटनेची पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपीची महुआ शहीद मोहल्ला, जीतू उर्फ पाली आणि अभिषेक कुमार यांचा देखील समावेश करण्यात आला, या आरोपींमधील काही लोक हे अल्पवयीन आहेत. अभिषेक आणि जीतू हा शहारत टेंपो चालवतो. 

अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याचं आमिष दाखवलं 

पीडितेनुसार, मंगळवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याचं आमिष दाखवलं होतं. पीडितेनं आपल्या दोन लहान मुलांसोबत गेली, तिथे अल्पवयीन मुलाने तिला एका ऑटो रिक्षात बसवलं होतं. त्याच ठिकाणी जीतू आणि अभिषेक हे उपस्थित होते. तिघांनीही मिळून पीडितेला बाजारात फिरवलं.  

पीडितेवर खोलीत जबरदस्ती लैंगिक अत्याचार

त्यानंतर एका खोलीत नेलं आणि तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. पीडितेनं विरोध केला असता, तिला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपीने त्या लहान मुलांचे लक्ष हटवण्यासाठी त्यांना मोबाइल दिला होता. या घटनेनंतर आरोपींनी पीडितेला नगर पोलीस ठाणे परिसरात पाण्याच्या टाकीजवळ सोडलं. नंतर 100 रुपये देऊन ते घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी प्रकरण समजून घेऊन तिघांना अटक केली. 

हे वाचलं का?