घरी सोडवतो म्हणून नेत अत्याचाराचा प्रयत्न, महिला जंगलात पळाली अन् रस्ता चुकली, पुढे काय घढलं?

मुंबई तक

odisha crime news : दुष्कर्माच्या प्रयत्नातून बचाव करण्यासाठी जंगलात पळालेल्या महिलेची ओडिशा पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने सुरक्षित सुटका केली. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

odisha crime news
odisha crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरी सोडवतो म्हणून नेत अत्याचाराचा प्रयत्न

point

महिला जंगलात पळाली अन् रस्ता चुकली, पुढे काय घढलं?

odisha crime news : ओडिशामध्ये एका महिलेची अत्यंत धाडसी आणि तितकीच थरारक सुटका पोलिसांनी केली. भुवनेश्वरच्या बाहेरील भागातील रतनपूर रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये अडकलेल्या महिलेला ड्रोन आणि रॉकेट आतिषबाजीच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दुष्कर्माच्या प्रयत्नातून स्वतःचा बचाव करण्यासाठी जंगलात पळून गेली होती. मात्र, जंगलात प्रवेश केल्यानंतर ती रस्ता चुकली आणि बाहेर पडण्याचा मार्ग तिला सापडत नव्हता. अखेर तिने मोबाईल फोनद्वारे पोलिसांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.

हेही वाचा : नवऱ्याचा खून, रक्ताच्या थारोळ्यात मुलगा; मन सुन्न करणारा घटनेचा थरार

घरी सोडवतो म्हणून नेत अत्याचाराचा प्रयत्न

पोलिसांच्या माहितीनुसार, महिला खुर्दा बसस्थानकातून एका मोटरसायकलस्वाराकडून लिफ्ट घेऊन प्रवास करत होती. मात्र, त्या व्यक्तीने तिला कथितपणे लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने रतनपूर रिझर्व्ह फॉरेस्टच्या दिशेने नेले. जंगलात पोहोचल्यानंतर आरोपीने तिच्यावर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, महिलेने त्याला जोरदार विरोध केला आणि त्याच्याशी झटापट करून तेथून पळ काढला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती जंगलाच्या आतपर्यंत धावत गेली. या गडबडीत ती जंगलात भरकटली आणि बाहेर पडण्याचा मार्ग हरवून बसली.

हेही वाचा : 'तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागा', लाठीचार्जवरुन राहुल गांधी पीएम मोदींवर भडकले

हे वाचलं का?