'परवानगीशिवाय ती रुममध्ये आली अन्...' महिला IPS अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, काय घडलं?
हैदराबादच्या नॅशनल पोलीस अकादमीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला आयपीएस प्रशिक्षणार्थीने एका सहकाऱ्यावर पाठलाग करणे, मारहाण, छळवणूक आणि खाजगी क्षणांचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'परवानगीशिवाय ती रुममध्ये आली अन्...'
महिला IPS अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
काय घडलं?
Crime News : हैदराबाद येथील 'सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी'मधील एका आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उदय कृष्णा रेड्डी असे या प्रशिक्षणार्थीचे नाव असून, त्याच्यावर एका महिला सहकाऱ्याने गंभीर छळाचे आरोप केले होते. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे.
'अश्लील व्हिडिओ नवऱ्याला पाठवले'
या घटनेपूर्वी 30 वर्षीय महिला आयपीएस अधिकारी प्रशिक्षणार्थीने उदय रेड्डीविरुद्ध पाठलाग करणे, मारहाण, धमकी देणे आणि संमतीविना खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करणे असे गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून हैदराबाद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. महिला अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उदयने तिला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवले, तिचे चारित्र्यहनन केले आणि तिच्या मोबाईलचा गैरवापर केला. तसेच, जुलै महिन्यात तिला खोलीत डांबून ठेवणे, गळा दाबण्याचा प्रयत्न करणे, सुरा दाखवून धमकी देणे आणि अश्लील व्हिडिओ तिच्या पतीला पाठवून ब्लॅकमेल करणे, असे गंभीर आरोप तिने केले आहेत.
हे ही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह राज्यातील 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचं रौद्ररूप; IMD चा अंदाज
'आमच्यात शारीरिक अन् भावनिक संबंध'
दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उदय कृष्णा रेड्डीने लिहिलेली दोन पानांची 'सुसाईड नोट' समोर आली आहे. त्यात त्याने महिला सहकाऱ्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "आम्ही दोघे जून 2025 पासून एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होतो. तिच्या लग्नानंतरही आमचे शारीरिक आणि भावनिक संबंध सुरू होते. तीच माझ्या खोलीत आली होती आणि तिने वाद घातला. स्वतःचा बचाव करण्यासाठी मी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते," असा दावा उदयने या नोटमध्ये केला आहे. तसेच, 9 जुलै रोजी ती स्वतः त्याच्या खोलीत आली होती, असा दावा करत तिच्या मित्रपरिवाराच्या चिथावणीमुळे तिने आपल्यावर खोटे आरोप केल्याचे त्याने म्हटले आहे.
हे ही वाचा : Personal Finance: Home Loan Prepayment खरंच फायदेशीर असते का?
मित्राच्या घरी जाऊन आत्महत्येचा प्रयत्न
रविवारी (19 जुलै) सायंकाळी उदयने मित्राच्या घरी जाऊन विषारी औषध प्राशन केल्याची माहिती सूत्रांनी दिली असली, तरी पोलीस प्रशासनाकडून आत्महत्येच्या प्रयत्नाची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. या प्रकरणातील सत्यता शोधण्यासाठी पोलीस सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करत असून, राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून उदयच्या प्रकृतीची पाहणी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.










