वसई-विरारला पावसाने झोडपलं, जनजीवन विस्कळीत; पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी

मुंबई तक

• 08:26 AM • 23 Jul 2026

हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Weather Report

Weather Report

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वसई-विरारला पावसाने झोडपलं

point

जनजीवन विस्कळीत

point

पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी

Weather Report : वसई-विरार शहरात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नालासोपारा पूर्वेतील गाला नगर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या साचलेल्या पाण्यातूनच रिक्षा चालक आणि इतर वाहनधारकांना मार्ग काढत कसरत करावी लागत आहे.

हे वाचलं का?

पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नेहमीप्रमाणे सकाळी दिसणारी शाळकरी विद्यार्थ्यांची आणि पालकांची लगबग आज पाहायला मिळाली नाही. सलगच्या पावसामुळे नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे.

हे ही वाचा : मुंबईसह राज्यात पाऊस घालणार थैमान, कुठे रेड; तर कुठे यलो अलर्ट

नोकरदारांचे हाल

शाळांना सुट्टी असली तरी नोकरदार वर्गाची मात्र पावसामुळे मोठी कोंडी झाली आहे. पावसात आणि रस्त्यांवर साचलेल्या सांडपाण्यातूनच रस्ता शोधत नागरिकांना आपल्या कामाचे ठिकाण गाठावे लागत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पावसाचा परिणाम झाल्यामुळे नोकरदारांचे हाल होत असून, अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

हे ही वाचा : Personal Finance: वयाच्या 30, 40 आणि 50 व्या वर्षी बँकेत किती असावी बचत?

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

दरम्यान, हवामान विभागाने आज दिवसभर वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, अत्यंत महत्त्वाचे किंवा अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळेवळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.