मुंबईसह राज्यात पाऊस घालणार थैमान, कुठे रेड; तर कुठे यलो अलर्ट
Maharashtra Weather : जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने मुंबईसह राज्यात हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी ऑरेंज, तर काही भागांत ऑरेंज अलर्टचा पावसाने अंदाज वर्तवलेला होता. अशातच आता 23 जुलै 2026 रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईसह राज्यात मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता
कुठे रेड तर कुठे यलो अलर्टचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपूर्वी मान्सून गायब झाल्याचं चित्र होतं, मात्र दोन दिवसांपासून मान्सूनने हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने मुंबईसह राज्यात मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी ऑरेंज, तर काही भागांत ऑरेंज अलर्टचा पावसाने अंदाज वर्तवलेला होता. दरम्यान, 23 जुलै 2026 रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : औरंगाबादमध्ये 20 वर्षीय नेपाळच्या महिलेवर अत्याचार, घटनेनं परिसर हादरला
कोकण
कोकण विभागात पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. अशातच मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. 23 जुलै रोजी कोकणात पावसाची शक्यता असणार आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा येथे ऑरेंज अलर्टची शक्यता असून अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्टचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सातारा घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.










