'पोलीस माझ्या कानात म्हणाले हे सरकार हटवा', राहुल गांधींनी सगळंच सांगितलं! राडा झाला तेव्हा काय घडलं?
Rahul Gandhi on Student Protest: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पोलिसांनी कानात "हे सरकार हटवा" असे सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: दिल्लीसह देशातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (22 जुलै) घेतलेल्या पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला खेचून नेले, मात्र त्याचवेळी काही पोलिसांनी कानात "हे सरकार हटवा" असे सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा आणि संपूर्ण विरोधी पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करत आंदोलनाच्या मागण्यांवर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट केले.
'पोलिसांनी कानात काय सांगितलं?'
राहुल गांधी म्हणाले की, हे खरं आहे की, आधी पोलिसवाले मला खेचून घेऊन गेले. पण माझ्या कानात ते हेच म्हणत होते की, हे सरकार हटवा. खरंच.. मी राजस्थानचा आहे.. यांना हटवा. आम्ही फक्त वर्दी घातली आहे... दुसरा म्हणतोय.. मी हरियाणाचा आहे यांना हटवा.. तर पोलिसांच्या देखील अशाच भावना आहेत. सत्य काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्या बिचाऱ्यांना ऑर्डर ऐकाव्या लागतात. जे ते करत आहेत. पण खरं तर जे घडतंय त्या सगळ्याबाबत पोलीस देखील खुश नाहीत. म्हणजे जे संवेदनशील पोलीस आहेत ते. ही पहिली गोष्ट आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, दिल्ली असो किंवा देशातील कोणतेही राज्य, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांचा संपूर्ण पाठिंबा राहील.
हे ही वाचा>> धर्मेंद्र प्रधान अपयशी शिक्षणमंत्री, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि त्यांच्या मागण्यांसाठी विरोधी पक्ष एकत्रितपणे लढणार आहे.










