बीड: अधिक मासात जावयाला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, पुढं काय घडलं?
Beed News : अधिक मास महिन्यात जावयाचा सासरवाडीत मान असतो. सासरवाडीत त्याचा पाहुणचार अगदी जोरदार होतो. मात्र, अधिक मासाच्या याच महिन्यात बीडच्या टाकरण परिसरात हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे. कारण जावईबापूंना देण्यासाठी तयार ठेवण्यात आलेली सोन्याची अंगठी थेट घरातील मांजराने गिळली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मांजरीने अंगठीचा घास फस्त केला
अंगठी बाहेर पडावी म्हणून मांजरीला औषध दिलं
Beed News : रोहिदास हातागळे - अधिक मास महिन्यात जावयाचा सासरवाडीत मान असतो. सासरवाडीत त्याचा पाहुणचार अगदी जोरदार होतो. मात्र, अधिक मासाच्या याच महिन्यात बीडच्या टाकरण परिसरात हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे. कारण जावईबापूंना देण्यासाठी तयार ठेवण्यात आलेली सोन्याची अंगठी थेट घरातील मांजराने गिळली, या संपूर्ण कुटुंबाला चार दिवस सोन्याच्या शोध घ्यावा लागला होता.
हे ही वाचा : नवरा बायकोच्या हनिमूनला नणंद, सासू-सासरे गेले; बायको रागवली अन्..
संबंधित घटनेनुसार, अधिक मासानिमित्त लेक आणि जावयाला धोंडे जेवणासाठी सासरवाडीत बोलावण्यात आले. जावईबापूंचा मान राखण्यासाठी सासूबाईंनी खास पाच ग्रॅम सोन्याची अंगठी बनवली होती. ती अंगठी जावयाला सरप्राईज म्हणून देण्याचा बेत होता. म्हणून अंगठी एका ठिकाणी लपवून ठेवण्यात आली होती.
मांजरीने अंगठीचा घास फस्त केला
आनंदाच्या वातावरणाने घरात एकच खळबळ उडाली. जावईबापूंच्या स्वागताची तयारी सुरू असताना अचानकपणे घरातील एका मांजरीने अंगठीचा घास फस्त केला. दरम्यान, जावईबापूंना सुरुवातीला काही कळाले नाही, मात्र घरातील धावपळ पाहून त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकार सांगण्यात आला. अखेर अंगठी नंतर देण्याचे आश्वासन देत जावईबापूंचा मान राखण्यात आला आणि कपडे देण्यात आली.
अंगठी बाहेर पडावी म्हणून मांजरीला औषध दिलं
पुढील काही दिवस मांजरावर बारीकपणे लक्ष ठेवण्यात आले. मांजर कधी बाहेर पडेल याकडे लक्ष ठेवण्यात आले होते, मात्र ती बाहेर आलीच नाही, तसेच अंगठी देखील सापडली नाही. उलट मांजर नंतर बिंधास्तपणे फिरत होते. अखेर कुटुंबियांनी पशुवैद्यकीय सल्ला घेण्यात आला. मांजराला उलटी व्हावी आणि अंगठी बाहेर पडावी यासाठी औषध देखील देण्यात आले. मात्र मांजराचा दुर्दैवी अंत झाला.









