Monsoon Update : 20 वर्षांचा विक्रम मोडला, अतिमुसळधार पाऊस, डेटाच सांगतोय!

मुंबई तक

मुंबईत यंदाच्या मान्सूनने दमदार हजेरी लावत जुलैच्या पहिल्याच आठवड्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, शहरात अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून काही ठिकाणी अनेक वर्षांतील विक्रम मोडल्याची नोंद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Rain
Mumbai Rain
Google CTA

बातम्या हायलाइट

point

Monsoon Update : 20 वर्षांचा विक्रम मोडला

point

अतिमुसळधार पाऊस, डेटाच सांगतोय!

Mumbai Rain : महाराष्ट्रात 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने घेतलेला हा रौद्र अवतार गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक ठरला आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक चिंतेत होते. हवामान खात्याने (IMD) यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे दुष्काळाची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसाने हवामान खात्याचे अंदाज आणि गेल्या 26 वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

पावसाने रचला नवा इतिहास

हवामान खात्याच्या ग्रीड डेटा (दर 25 किमी त्रिज्येच्या वेदर स्टेशनवरून गोळा केलेली माहिती) नुसार, 1 जून ते 7 जुलै या 36 ते 37 दिवसांच्या कालावधीत मुंबईत तब्बल 1,304 मिलीमीटर (mm) पाऊस नोंदवला गेला आहे. 2000 सालापासून 2026 पर्यंतचा डेटा पाहिला तर हा या कालावधीतील सर्वोच्च पाऊस आहे. 2000 ते 2005 या काळात पाऊस साधारण 450 ते 922 mm च्या दरम्यान होता. तर 2006 मध्ये या कालावधीत 1,182 mm पाऊस झाला होता, ज्याचा विक्रम तब्बल 20 वर्षांनंतर 2026 मध्ये मोडला गेला आहे. 2014 मध्ये या काळात सर्वात कमी म्हणजेच केवळ 293 mm पाऊस झाला होता. 2016 ते 2025 या वर्षांमध्ये पाऊस 700 ते 1100 mm च्या दरम्यान राहिला, परंतु विक्रमी पातळी गाठू शकला नव्हता. 2026 च्या 1,304 mm पावसामुळे मुंबईने पावसाचा एक नवा इतिहास रचला आहे.

हे ही वाचा : Monsoon Update : राज्यात अचानक पाऊस का वाढलाय? पुढील तीन दिवस काय इशारा?

4 दिवसांत 754 mm पावसाची नोंद

केवळ 1 जून ते 6 जुलै या कालावधीचा विचार केला तर एकूण 1,236 mm पाऊस झाला आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2 जुलै ते 6 जुलै या केवळ पाच दिवसांत मुंबईत 754 mm पावसाची नोंद झाली. या दिवसांची ऐतिहासिक सरासरी केवळ 150 mm असते. 5 जुलै रोजी तर एकाच दिवसात 225 mm पाऊस कोसळला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मुंबईत संपूर्ण जुलै महिन्यात जेवढा पाऊस पडतो (साधारण 700 ते 750 mm), तेवढा पाऊस मुंबईकरांनी अवघ्या चार ते पाच दिवसांत अनुभवला आणि सहन केला.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट, जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

2005 मध्ये काय घडलं?

26 जुलै 2005 रोजी मुंबईत 944 mm पाऊस झाला होता आणि संपूर्ण मुंबई वाहून गेली होती. मग आता 1,236 mm पेक्षा जास्त पाऊस होऊनही तशी परिस्थिती का उद्भवली नाही? यामागचे मुख्य कारण म्हणजे वेळेचे गणित. 2005 मध्ये 944 mm पाऊस अवघ्या 24 तासांत (एकाच दिवसात) झाला होता. त्यासोबतच मिठी नदीची स्वच्छता नसणे, हाय टाईट आणि तीव्र कमी दाबाचे क्षेत्र यामुळे मुंबई बुडाली होती. याउलट, 2026 मधील पाऊस हा 36 दिवसांमध्ये विभागून पडला आहे. त्यामुळे जरी नागरिकांचे हाल झाले असले, तरी 2005 सारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नाही.

हे वाचलं का?