Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट, जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मुसळधार ते अति मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. अशातच काही जिल्ह्यांना यलो तर काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. अशातच राज्यातील काही भागांत रेड अलर्टचा अंदाज आहे, दरम्यान 8 जुलै रोजी राज्यातील हवामान कसं असेल याचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या मान्सूनने धुमाकूळ घातला
8 आणि 9 जुलै रोजी जिल्ह्यांना यलो आणि 2 ठिकाणी ऑरेंज अलर्टचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मुसळधार ते अति मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. अशातच काही जिल्ह्यांना यलो तर काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागांत रेड अलर्टचा अंदाज आहे, दरम्यान, 8 जुलै रोजी राज्यातील हवामान कसं असेल याचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.
हे ही वाचा : डोंबिवलीत शिंदे सेनेच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टरला मारहाण, Video व्हायरल
कोकण
कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली असून पावसाचा यलो अलर्ट आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्ट वर्तवण्यात आला. तसेच मुंबई आणि ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आलाय. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे.










