महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरील पूल कोसळला, पर्यटक अडकले, नागरिकांची दाणादाण

इम्तियाज मुजावर

Maharashtra Monsoon : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीवरील पूल कोसळला आहे. पूल कोसळल्याने पलिकडील बाजूस काही लोक अडकून बसली आहेत. पर्यटकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहे. पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या मदतीने काढण्याचे काम सुरु आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Monsoon
Maharashtra Monsoon
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वेण्णा नदीवरील पूल कोसळला

point

महाबळेश्वर परिसरातील वृक्ष उन्मळून पडले

Maharashtra Monsoon : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीवरील पूल कोसळला आहे. पूल कोसळल्याने पलिकडील बाजूस काही लोक अडकून बसली आहेत. पर्यटकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहे. पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या मदतीने काढण्याचे काम सुरु आहे. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासन काम करत आहे. 

हे ही वाचा : नाशिकमध्ये उद्या होणार प्रचंड मोठी ढगफुटी; CM फडणवीसांनी स्वत:च दिली माहिती, रेड अलर्ट जारी!

महाबळेश्वर परिसरातील वृक्ष उन्मळून पडले

महाबळेश्वर परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीक झाल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. दुर्गम भागात नागरिक अडकून पडलेले दिसून येत आहेत. अडकलेल्या पर्यटकांचे बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.  अशातच वेण्णा नदीने पातळी ओलांडली असल्याची माहिती समोर आली आहे, स्थानिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

4 तासांत 513 मिलीमीटर पावसाची नोंद

गेल्या 24 तासांत 513 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, यामुळे संपूर्ण परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केलं आहे. 

हे ही वाचा : साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत गोठ्यावर कोसळली, जनावरांचा मृत्यू

महाबळेश्वर हे राज्यातील महत्त्वाचं पर्यंटन क्षेत्र आहे. या ठिकाणी देशभरातून अनेक पर्यंटक फिरण्यासाठी येत असतात. पावसाळ्यात या परिसरात निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. मात्र, सध्या सुरु असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर येथील नागरिकांसह पर्यटकांची दाणादाण उडवली आहे.   
 

हे वाचलं का?