नाशिकमध्ये रेड अलर्ट, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद; व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

Trimbakeshwar temple closest : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात आज 7 जुलै 2026 रोजी पावसाचा हाय अलर्टचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. अशातच आता नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा ट्रस्टने आणि स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

Trimbakeshwar temple closest
Trimbakeshwar temple closest
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा मोठा अलर्ट

point

नाशिक जिल्ह्यांत ढगफुटीसदृश्य परिस्थितीची शक्यता 

Trimbakeshwar Temple Closest : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात आज 7 जुलै 2026 रोजी पावसाचा हाय अलर्टचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. अशातच आता नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा ट्रस्टने आणि स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मंदिर बंद असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 

हे ही वाचा : साताऱ्यात जीपवर झाड कोसळून सहा जण जखमी, प्रवाशांची ओळख समोर

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा मोठा अलर्ट

राज्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा मोठा अलर्ट वर्तवलेला आहे. भारतीय हवामान विभागाने या परिसरात रेड अलर्टचा अंदाज जारी केलेला आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपूरीत मुसळधार पावसाची शक्यता दाट आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्रात ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे, ही परिस्थिती लक्षात घेता राज्यातील शाळांना सुट्टी दिली आहे. 

नाशिक जिल्ह्यांत ढगफुटीसदृश्य परिस्थितीची शक्यता 

सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत हवामानाबाबत माहिती दिली. नाशिक जिल्ह्यांत ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिली. हवामान विभागाने एकाच दिवसांत 300 ते 350 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. 

हे ही वाचा : सातारा जिल्ह्यात जलप्रलय, तब्बल 116 गावांचा संपर्क तुटला, शेकडो एकर शेती पाण्याखाली!

अशातच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ज्या भागांत ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण होणार आहे अशा ठिकाणी अधिकचा धोका निर्माण होईल. ठिकठिकाणांवरील नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल अशी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, राज्य अपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. 

हे वाचलं का?