बायकोचा राग मुलीवर काढला, नराधम बापाने 11 महिन्यांच्या लेकीसोबत काय केलं?
बेंगलोरमध्ये एका 11 महिन्यांच्या चिमुरडीचा बेडवरुन पडून मृत्यू झाला होता. मात्र पोलीस तपासात वेगळाच प्रकार समोर आला. याप्रकरणी तिच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोचा राग मुलीवर काढला
नराधम बापाने 11 महिन्यांच्या चिमुरडीसोबत काय केलं?
Crime News : अकरा महिन्यांच्या चिमुरडीचा बेडवरून पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता मुलीच्या वडिलांवर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कौटुंबिक वादादरम्यान त्यानेच रागाच्या भरात मुलीला जमिनीवर फेकल्याचा आरोप आहे. सुरुवातीला 'आकस्मिक मृत्यू' (UDR) म्हणून नोंदवण्यात आलेल्या या प्रकरणाला शवविच्छेदन अहवालानंतर नाट्यमय कलाटणी मिळाली. कारण त्यात चिमुरडीच्या शरीरावर गंभीर अंतर्गत जखमा असल्याचे समोर आले. केवळ दोन फूट उंच बेडवरून पडल्याने अशा जखमा होणे अशक्य होते.
बेडवरुन पडल्याची तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बेंगलोरमधील आवलाहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुरुवातीला अकरा महिन्यांची मुलगी बेडवरून पडल्याने जखमी झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर रुग्णालयाच्या माहितीवरून मेडिको-लीगल केस नोंदवण्यात आली आणि मुलीच्या वडिलांनीच मुलगी बेडवरून पडल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता.
हे ही वाचा : सातारा जिल्ह्यात जलप्रलय, तब्बल 116 गावांचा संपर्क तुटला, शेकडो एकर शेती पाण्याखाली!
चेहरा, छाती, पाय अन् गुप्तांगाजवळ जखमा
शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. अहवालात चिमुरडीच्या मृत्यूचे कारण बरगड्या आणि इतर हाडे मोडणे, अंतर्गत रक्तस्त्राव, शॉक आणि श्वसनसंस्था निकामी होणे यासह अनेक गंभीर अंतर्गत जखमा असल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे तर तिच्या चेहऱ्यावर, छातीवर, पायांवर आणि गुप्तांगाजवळ अनेक बाह्य जखमा आढळून आल्या. केवळ दोन फुटांवरून पडल्याने एवढ्या गंभीर जखमा होऊच शकत नाहीत, या निष्कर्षावरून आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : रत्नागिरी : खेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना, डोंगराचा कडा खचला अन् क्षणात सर्व काही संपलं!










