रत्नागिरी : खेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना, डोंगराचा कडा खचला अन् क्षणात सर्व काही संपलं!

मुंबई तक

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच खेड तालुक्यात भूस्खलन झाल्याची माहिती समोर येत आहे. या भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरु आहे.

ADVERTISEMENT

Ratnagiri Landslide
Ratnagiri Landslide
Google CTA

बातम्या हायलाइट

point

रत्नागिरी : खेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना,

point

डोंगराचा कडा खचला अन् क्षणात सर्व काही संपलं!

Ratnagiri Landslide, गोकुळ कांबळे : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडी येथे सोमवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास भीषण भूस्खलनाची घटना घडली. डोंगराचा कडा खचून झालेल्या या भूस्खलनामुळे एका निवासी घराचा काही भाग कोसळला आणि घरातील तीन जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अचानक ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरु

दुर्घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 75 वर्षीय कल्पना शेलार यांना ग्रामस्थांनी तातडीने आणि सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर सध्या कळबणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र 85 वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि 35 वर्षीय सतीश शेलार हे दोघे अद्यापही ढिगाऱ्याखालीच अडकले असून त्यांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा : मुंबई : अचानक उघडला लिफ्टचा दरवाजा अन् घडलं भयानक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

युद्धपातळीवर बचावकार्य

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील, स्थानिक तहसीलदार, खेड पोलीस तसेच महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रात्रीपासूनच शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

हे ही वाचा : Personal Finance: पगारदारांनी दर महिन्याला किती सोने खरेदी करावे? हा पाहा स्मार्ट फॉर्म्युला

आणखी काही घरे धोकादायक स्थितीत

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त परिसरात अजूनही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. सततच्या पावसामुळे परिसरातील आणखी काही घरे अत्यंत धोकादायक स्थितीत आली असून, पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने स्थानिक नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
 

हे वाचलं का?