BMC कडून मोठा अलर्ट जारी.. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही सोडलं घरी, आता 80 ते 90 किमी वेगाने वाहणार वारे!
Mumbai Rain Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी सुमारे 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
आपत्कालीन मदतीसाठी 1916 हेल्पलाइन उपलब्ध
सुमारे 15 हजार अधिकारी आणि कर्मचारी बचाव आणि आपत्कालीन सेवांसाठी तैनात
मुंबई: मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसासह ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे विविध प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
BMC ने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना
महापालिकेने नागरिकांना खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
- अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका.
- झाडे, जीर्ण इमारती, मोठे होर्डिंग्ज आणि विद्युत खांबांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- झाडांच्या खाली किंवा धोकादायक ठिकाणी वाहने उभी करू नका.
- समुद्रकिनारा, चौपाटी आणि पाणथळ भागात जाणे टाळा.
- पूरग्रस्त किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळा.
हे ही वाचा>> अल-निनो असतानाही एवढा पाऊस का पडतोय? महाराष्ट्रात अचानक पावसाचा कहर
अफवांवर विश्वास ठेवू नका
प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. हवामान, वाहतूक आणि आपत्कालीन परिस्थितीबाबत केवळ अधिकृत शासकीय यंत्रणा, हवामान विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचेच पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत '1916' हेल्पलाइनवर संपर्क करा
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे ही वाचा>> मुंबई आणि पुणेकरांनो आता फक्त वाट पाहा.. तुफान पावसामुळे किती ट्रेन थेट रद्द?
15 हजार अधिकारी-कर्मचारी मैदानात
मुंबईतील संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध विभागांतील सुमारे 15 हजार अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. पाणी उपसा, झाडे हटविणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, बचावकार्य आणि आपत्कालीन सेवा यासाठी विविध पथके 24 तास कार्यरत आहेत.
याशिवाय वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हवामान विभागाचा इशारा काय?
- मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी.
- अतिमुसळधार पावसाची शक्यता.
- ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज.
- सखल भागात पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता.
मुसळधार पाऊस आणि हवामानाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी
- मुंबईसाठी IMD कडून रेड अलर्ट जारी.
- ताशी 80–90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
- खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश.
- अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी.
- नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन.
- समुद्रकिनारा, झाडे, होर्डिंग्ज आणि जीर्ण इमारतींपासून दूर राहण्याच्या सूचना.
