पुणे–मुंबई जाणार आहात? आधी ही बातमी वाचा; एक्स्प्रेसवे, जुना महामार्ग बंद.. मुसळधार पावसाचा कहर

मुंबई तक

Mumbai Pune Express Way Closed: दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

pune mumbai expressway and old highway completely closed authorities urge citizens to avoid travel amid landslides and flood like situation heavy rains wreak havoc
मुंबई-पुणे प्रवास पूर्णपणे ठप्प
Google CTA

पुणे: मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेसवे) आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरड कोसळणे, रस्त्यावर पाणी साचणे आणि पर्यायी मार्गांवरही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे–मुंबई प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई-पुणे प्रवास पूर्णपणे बंद

* सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई एक्स्प्रेसवे आणि जुना मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली आहे.
* पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
* प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई दरम्यानचा प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.
* ज्यांचा प्रवास अत्यावश्यक आहे, त्यांनी प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या वाहतूक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा, असे सांगण्यात आले आहे.

पर्यायी मार्गांवरही पूरसदृश परिस्थिती

हे वाचलं का?