नवऱ्याला कॉफीतून दिले गुंगीचे औषध, गाढ झोप लागताच बायकोनं केलं भयंकर कांड

मुंबई तक

मेरठमधील एका व्यक्तीने महिलेसोबत मैत्री केली. त्याच्या बायकोला ही गोष्ट काही पटली नाही. अखेर तिने एक टोकाचा निर्णय घेतला. रात्री झोपण्याआधी नवऱ्याला कॉफीतून गुंगीचे औषध दिले अन् पुढं काय घडलं जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याला कॉफीतून दिले गुंगीचे औषध

point

गाढ झोप लागताच बायकोनं केलं भयंकर कांड

Crime News : एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत पती-पत्नीच्या नात्यातील वाद आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता या मालिकेत आणखी एका गंभीर घटनेची भर पडली आहे. नवऱ्याने दुसऱ्या महिलेशी मैत्री केल्याच्या संशयावरून पत्नीने त्याच्या गुप्तांगावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील ही घटना आहे.

मूलबाळ नसल्यामुळे बायको काळजीत

पीडित नदीम याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा विवाह शबनम हिच्याशी सुमारे साडेसात वर्षांपूर्वी झाला होता. या दांपत्याला अद्याप कोणतीही मूलबाळ झालेले नाही. यामुळे नदीम आपल्याला सोडून दुसरे लग्न करेल, असा शबनमच्या मनात सतत संशय आणि भीती होती. याच कारणावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. याच रागातून आणि संशयातून शबनमने पतीला धडा शिकवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा : मुंबई : IIT पवई कॅम्पसमध्ये रात्री आगीचा भडका! दोन चिमुकल्यासंह पाचजण होरपळले

रात्री काय घडलं?

8 ऑक्टोबरच्या रात्री नदीम कॉफी प्यायल्यानंतर झोपी गेला होता. त्याने केलेल्या आरोपानुसार, शबनमने त्याच्या कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते, ज्यामुळे त्याला गाढ झोप लागली. तो झोपेत असताना शबनमने त्याच्यावर चाकूने गुप्तांगावर वार केले. रात्री सुमारे 2 वाजता जेव्हा नदीमची शुद्ध हरपलेली अवस्थेत जाग आली, तेव्हा त्याला या भयानक प्रकाराची माहिती झाली. या घटनेनंतर शबनम तेथून पळून गेली, तर स्थानिक रहिवाशांनी गंभीर जखमी नदीमला तातडीने वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा : कोल्हापुरात थरार! भरधाव कंटेनरची तीन दुचाकींना धडक, चौघांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी काय सांगितलं?

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने दुसऱ्या महिलेशी मैत्री केल्याच्या संशयावरून पत्नीने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपी पत्नी शबनम हिला ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.