मुंबई : IIT पवई कॅम्पसमध्ये रात्री आगीचा भडका! दोन चिमुकल्यासंह पाचजण होरपळले
मुंबईतील आयआयटी पवई येथे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जण होरपळल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : IIT पवई कॅम्पसमध्ये रात्री आगीचा भडका!
दोन चिमुकल्यासंह पाचजण होरपळले
IIT Mumbai Gas Leak Fire, एजाज खान : मुंबईतील आयआयटी पवई कॅम्पसमध्ये गुरुवारी (8 ऑक्टोबर) रात्री एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. संस्थेच्या आवारात सुरू असलेल्या एका बांधकामाच्या लेबर कॅम्पमध्ये अचानक गॅस सिलेंडरची गळती झाल्याने मोठा भडका उडाला. या भयानक आगीत दोन निष्पाप लहान मुलांसह एकूण पाच जण गंभीररीत्या भाजले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय घडलं?
ही घटना गुरुवारी रात्री सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा कामगार दिवसभराचे काम आटोपून लेबर कॅम्पमध्ये विश्रांती घेत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कॅम्पजवळ ठेवलेल्या एका गॅस सिलेंडरमधून अचानक गॅसची गळती सुरू झाली. याच दरम्यान तिथे खेळत असलेली दोन लहान मुले उत्सुकतेपोटी गॅस गळती नेमकी कुठे होतेय हे पाहण्यासाठी सिलेंडरच्या जवळ गेली. मुलांना परिस्थितीचे गांभीर्य समजण्यापूर्वीच सिलेंडरने पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळा सर्वत्र पसरल्या. मुलांचा आक्रोश ऐकून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेले इतर कामगारही या आगीत होरपळले.
हे ही वाचा : भाजपचे आरोप ते आंदोलनाचा चेहरा...विवेकानंद पाटीलचा थेट पलटवार
जखमींची प्रकृती चिंताजनक
अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड धावपळ आणि गोंधळ उडाला. तेथे उपस्थित इतर कामगार आणि सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे सर्व पाचही जखमींना तातडीने उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, चार जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक चांगल्या व विशेष उपचारांसाठी कस्तूरबा रुग्णालयात हलवण्याचा (रेफर करण्याचा) सल्ला दिला.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'हे' जिल्हे होरपळणार, 'या' भागांना उन्हाचा चटका
गॅस गळतीचे नेमके कारण काय?
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सध्या पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून गॅस गळतीचे नेमके तांत्रिक कारण आणि आग लागण्यामागच्या घटकांची सखोल चौकशी केली जात आहे.
