Maharashtra Weather : राज्यातील 'हे' जिल्हे होरपळणार, 'या' भागांना उन्हाचा चटका

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात सध्या बहुतांश भागांत पावसाचा लपंडाव पाहायला मिळत आहे, तसेच काही भागांत उष्ण दमट हवामानाची शक्यता वर्तवविलेली आहे. भारतीय हवामान विभागाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद केला आहे.  

ADVERTISEMENT

Maharashtra Weather (AI Photo)
Maharashtra Weather (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्या बहुतांश भागांत पावसाचा लपंडाव

point

तर काही भागांना उन्हाचा चटका

Maharashtra Weather : राज्यात सध्या बहुतांश भागांत पावसाचा लपंडाव पाहायला मिळत आहे, तसेच काही भागांत उष्ण दमट हवामानाची शक्यता वर्तवविलेली आहे. काही भागांत पावसाच्या सरी या मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद केला आहे.  

हे ही वाचा : नानांसोबतची 'ती' इच्छा अपूर्णच.. रितेश देशमुखची भावनिक पोस्ट

कोकण 

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबईत काही ठिकाणी उष्णतेचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात दुपारनंतर किंवा सायंकाळी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. अशातच काही ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा परिसर आणि अहिल्यानगरमध्ये कोरड्या हवामानाची शक्यता आहे. नाशिक येथील तापमान हे 21 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा परिसरात हवामान कोरडे राहिल अशी शक्यता आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि सांगलीत काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा आणि सोलापूरमध्ये काही भागात हलक्या पावसाची नोंद आहे.