Personal Finance: पगारदारांनी दर महिन्याला किती सोने खरेदी करावे? हा पाहा स्मार्ट फॉर्म्युला
Gold Investment: एकरकमी नव्हे, तर नियमित छोट्या गुंतवणुकीतून सोन्याचा मजबूत फंड उभा राहू शकतो. सोनं महाग असलं तरी थोड्या खरेदीतून तुम्हाला मोठा फायदा होईल. जाणून घ्या याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
Personal Finance Tips for Gold Investment: भारतात सोने हे केवळ दागिने खरेदी करण्याचे साधन नाही, तर ते सुरक्षित गुंतवणुकीचाही एक महत्त्वाचा पर्याय मानले जाते. महागाई, आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील चढ-उतार यांच्या काळात सोन्याने अनेकदा गुंतवणूकदारांना आधार दिला आहे. मात्र, प्रत्येक महिन्याला किती सोने खरेदी करावे, हा प्रश्न अनेक पगारदारांना पडतो.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील गुंतवणूक ही संपूर्ण पोर्टफोलिओचा एक भाग असावी. सर्व बचत सोन्यात गुंतवणे योग्य नाही.
गुंतवणुकीचा आदर्श फॉर्म्युला
तज्ज्ञांच्या मते, एकूण गुंतवणुकीपैकी 5 ते 10 टक्के हिस्सा सोन्यात ठेवणे योग्य मानले जाते. काही गुंतवणूकदार जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हा वाटा 15 टक्क्यांपर्यंत ठेवतात. मात्र, सामान्य पगारदारांसाठी 5 ते 10 टक्के पुरेसे ठरू शकते.










