दुबईहून परतला अन् विळ्याने चिरला बायकोचा गळा, धक्कादायक कारण समोर

मुंबई तक

दुबईहून परतलेल्या एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या 26 वर्षीय पत्नीची विळ्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना 6 जुलै रोजी सोमवारी पहाटेच्या सुमारास बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात घडली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दुबईहून परतला अन् विळ्याने चिरला बायकोचा गळा

point

धक्कादायक कारण समोर

Crime News : एक मन सुन्न करणारी आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. दुबईहून नुकत्याच परतलेल्या मनोज भगत नावाच्या एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या 26 वर्षीय पत्नीची, रिंकू कुमारीची विळ्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना 6 जुलै रोजी सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेनंतर रिंकूचा रक्ताच्या थारोळ्यात माखलेला मृतदेह बेडच्या खाली पडलेला आढळून आला. या अत्यंत क्रूर कृत्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून, याप्रकरणी मृत रिंकूचे वडील राजेंद्र भगत यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतात

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज भगत हा दुबईमध्ये नोकरी करतो. आपल्या मेहुणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो काही दिवसांपूर्वीच भारतात परतला होता. रिंकूच्या मोठ्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मनोजचे दुसऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून सतत खटके उडत होते आणि त्यांच्यात तीव्र वाद होत असत.

हे ही वाचा : मुंबईची खबर : 24 तासात मुंबईत कोसळली 523 झाडं, काँक्रिटीकरणचा फटका बसतोय का?

विळ्याने चिरला गळा

हत्येच्या आदल्या रात्री म्हणजेच रविवारी, मनोज आणि रिंकू या दोघांनी एकत्र जेवण केले होते. इतकेच नव्हे तर मनोजने स्वतः रिंकूला काही दागिनेही घातले होते, ज्यामुळे सर्व काही सुरळीत असल्याचा भास होत होता. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा त्याच जुन्या कारणावरून जोरदार वाद पेटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात मनोजने घरात असलेला विळा उचलला आणि रिंकूचा गळा चिरून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

हे ही वाचा : केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी सियानं बरंच काही केलं सर्च, पोलिसांनी डोकं धरलं

मनोजचा शोध सुरु

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हत्या केल्यानंतर आरोपी मनोज घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला असून, पोलीस सध्या वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून त्याचा कसून शोध घेत आहेत आणि त्याला लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
 

हे वाचलं का?