26 वर्षीय तरुणी त्याच्यासोबत हॉटेलमध्ये आली..अन् शेवटी तिची बॉडीच सापडली, नेमकं काय घडलं?
hyderabad crime news : एका हॉटेलच्या रुममध्ये 26 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या की हत्या, याचा सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
26 वर्षीय तरुणी त्याच्यासोबत हॉटेलमध्ये आली..
अन् शेवटी तिची बॉडीच सापडली, नेमकं काय घडलं?
hyderabad crime news : हैदराबादमधील एका हॉटेलच्या खोलीत 26 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत महिलेची ओळख रेनुका अशी असून ती अलवाल परिसरातील रहिवासी होती. एमडी लाइन्सजवळील हॉटेल ग्रँड लॉजमधील एका खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : 'अहो..आज व्रत आहे', बायको संबंध टाळायची; शेवटी दाढी करताना सापडली अन् सगळं उलगडलं
रेनुका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली
प्राथमिक तपासानुसार, रेनुका गुरुवारी रात्री 34 वर्षीय फारूक याच्यासोबत हॉटेलमध्ये आली होती. फारूक हा गोलकोंडा परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही वेळासाठी तो खोलीबाहेर गेला होता. परत आल्यानंतर त्याला रेनुका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, असा त्याचा दावा आहे. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि पुढील कारवाई सुरू केली.
हेही वाचा : 'तुम्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे गुलाम नाहीत, जनतेचे सेवक आहात' हायकोर्टाने पोलिसांना फटकारले










