नवऱ्याने रीलस्टार बायकोला संपवले, मुलांसमोरच चाकूने सपासप वार, धक्कादायक कारण समोर
एका रीलस्टारची तिच्या पतीने धारदार शस्त्राने कथितरित्या हत्या केली. यामागे रील बनवण्याचे काम आणि मालमत्तेचा वाद ही कारणे सांगितली जात आहेत. ही घटना त्यांच्या मुलांसमोर घडली असून, त्यात एक मूल जखमी झाले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याने रीलस्टार बायकोला संपवले
मुलांसमोरच चाकूने सपासप वार
धक्कादायक कारण समोर
Crime News : एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रीलस्टारची हत्या करण्यात आली आहे. निशा चौहान असे 28 वर्षीय मृत रीलस्टारचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे ही हत्या, तिच्या नवऱ्याने केली आहे. निशा इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय होती आणि स्वतःचे ब्युटी पार्लरही चालवत होती. प्रदीप असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीचा जीव घेतल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून गंभीर जखमी करून घेतले, सध्या त्याला पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील ही घटना आहे.
जमिनीवरुन जोरदार वाद
निशाचे हिच्या इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स होते. याच प्रसिद्धीमुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असत, अशी माहिती समोर आली आहे. हत्येच्या आधी एका जमिनीवरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या दोघांनी नुकतीच एक मालमत्ता खरेदी केली होती, ज्याच्या रजिस्ट्रीवरून गुरुवारी (2 जुलै) त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. हा वाद शुक्रवारच्या सकाळपर्यंत सुरूच राहिला आणि वाद इतका विकोपाला गेला की आरोपी पतीने स्वतःवरील नियंत्रण गमावले.
हे ही वाचा : 'तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका...' अमित साटम फिदीफिदी हसले, राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं
मुलांसमोरच आईवर सपासप वार
शुक्रवारी सकाळी वाद वाढल्याने प्रदीपने घरातील धारदार शस्त्र आणले आणि मुलांसमोरच निशावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून मुले घाबरून मोठ्याने ओरडू लागली. यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेला त्यांचा एक मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला. निशाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपी प्रदीपने त्याच शस्त्राने स्वतःवरही वार केले. मुलांचा आरडाओरडा ऐकून जेव्हा शेजारी घरात पोहोचले, तेव्हा निशा मृत अवस्थेत पडली होती आणि प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत होता.
हे ही वाचा : बर्थडे पार्टीच्या बहाण्याने बोलावलं, अन् घात झाला, तीन मित्रांनी मिळून केला मर्डर
शवविच्छेदन अहवालात काय?
शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. घटनास्थळावरून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीवरूनही पोलिसांना या वादाची आणि हत्येची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी निशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आरोपी प्रदीपवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाचा पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत.










