'तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका...' अमित साटम फिदीफिदी हसले, राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं

मुंबई तक

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. साटम यांच्यासारख्या असंवेदनशील व्यक्तींना फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. याविषयी त्यांनी सोशल मीडियात सविस्तर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका...

point

अमित साटम फिदीफिदी हसले

point

राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं

Raj Thackeray : भाजपचे आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियीवर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत बोलताना दिसत आहेत. यामध्ये ते 'काल झाडावर होतं, आज मॅनहोल..' असं म्हणताना दिसत आहेत. हे सांगताना ते हसत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा दुर्दैवी घटनेविषयी बोलताना ते हसत असल्यानं त्यांच्या असंवेदनशीलतेवर चहुकडून टीका होत आहे. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. साटम यांच्यासारख्या असंवेदनशील व्यक्तींना फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. याविषयी त्यांनी सोशल मीडियात सविस्तर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, जाणून घेऊया.

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?

देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे!

तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.

हे वाचलं का?