'गुन्हे धुण्याचे वॉशिंग मशीन, राज्यात काय सुरु आहे?', पक्षांतरावरुन हायकोर्टाचे संतप्त सवाल
bombay high court : 'भाजप मुर्दाबाद'सारख्या घोषणा देणे हे तडीपारीचे कारण ठरू शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'गुन्हे धुण्याचे वॉशिंग मशीन, राज्यात काय सुरु आहे?',
पक्षांतरावरुन हायकोर्टाचे संतप्त सवाल
bombay high court, मुंबई : 'एखादा पक्ष मुर्दाबाद' किंवा 'एखादा नेता मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या म्हणून कोणत्याही नागरिकावर तडीपारीची कारवाई करता येणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर कठोर ताशेरे ओढले आहेत. नागरिक हे सरकारचे गुलाम नसून त्यांना राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार आहेत, याची आठवण न्यायालयाने करून दिली. पोलिस हे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे नोकर नसून जनतेचे सेवक आहेत, असे स्पष्ट करत न्यायालयाने एका प्रकरणातील तडीपारीचा आदेश रद्द केला. सरकारविरोधी घोषणा देणे हा कायद्याचा भंग ठरत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
हेही वाचा : Maharashtra weather : कोकणासह राज्यभरात धो-धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना मोठा अलर्ट
तडीपारीचा 'तो' आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
या प्रकरणात सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एसडीपीआय) सरचिटणीस सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी यांनी डिसेंबर 2025 मध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चात 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तसेच विभागीय कोकण आयुक्तांनी त्यांच्याविरोधात तडीपारीचा आदेश जारी केला होता. या आदेशाला चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने या कारवाईची तपासणी करत अखेर तडीपारीचा आदेश रद्द केला.
हेही वाचा : विवाह्यबाह्य संबंधांवरुन वाद, बायकोने ओढणीने गळा आवळून केला नवऱ्याचा खून










