विवाह्यबाह्य संबंधांवरुन वाद, बायकोने ओढणीने गळा आवळून केला नवऱ्याचा खून

मुंबई तक

पतीचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपावरून एका 20 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील जगतपुरी परिसरातील ही घटना आहे. पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणाचा उलगडा केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

विवाह्यबाह्य संबंधांवरुन वाद

point

बायकोने ओढणीने गळा आवळून केला नवऱ्याचा खून

Crime News : एका 20 वर्षीय महिलेने चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या जोरदार वादावादीनंतर आपल्या पतीची ओढणीने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या हत्याकांडाचा छडा लावला. गुन्ह्यानंतर जवळच एके ठिकाणी लपून बसलेल्या अलिषा नावाच्या आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. 2 जुलै रोजी पहाटे 3:52 च्या सुमारास नियंत्रण कक्षाला एक महिला तिच्या पतीचा गळा आवळत असल्याचा फोन आला होता. त्यानंतर मुस्तकीम ऊर्फ साहिल (20) हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिल्लीतील जगतपुरी भागातील ही  घटना आहे.

विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साहिलच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे जगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी अलिषाने सांगितले की, तिचा पती साहिल तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत होता. याच संशयातून घटनेच्या रात्री साहिलने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तो तपासू लागला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले आणि वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले.

हे ही वाचा : दोन लग्न केलेल्या प्रेयसीची हत्या, चौथ्या तरुणाच्या संपर्कात असल्याचा प्रियकराचा दावा

अलिषाने काढला पळ

या वादादरम्यान संतप्त झालेल्या अलिषाने पती साहिलच्या छातीवर बसून त्याला पूर्णपणे दाबून टाकले आणि स्वतःच्या ओढणीने त्याचा गळा आवळला. काही वेळातच जेव्हा साहिलची आई खोलीत आली, तोपर्यंत अलिषाने घरातून पळ काढला होता. अटक टाळण्यासाठी ती जवळच एके ठिकाणी जाऊन लपली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत तिचा माग काढला आणि तिला ताब्यात घेतले.

हे ही वाचा : नवी मुंबई : 'चुकीचे इंजेक्शन'ने 2 गर्भवती महिलांचा मृत्यू? मनसे आक्रमक अन् पहिली कारवाई

अखेर हत्येची कबुली

पोलिसांच्या तपास पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणाची वैज्ञानिक तपासणी केली, साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण करून संशयित अलिषाची कसून चौकशी केली. सततच्या चौकशीत अखेर अलिषाने हत्येची कबुली दिली आणि घटनेचा संपूर्ण क्रम पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ओढणी जप्त केली आहे. पोलिसांचा तत्पर प्रतिसाद, फॉरेन्सिक तपासणी आणि अचूक चौकशीमुळे अवघ्या काही तासांतच या प्रकरणाचा छडा लागला आहे.

हे वाचलं का?