नवी मुंबई : 'चुकीचे इंजेक्शन'ने 2 गर्भवती महिलांचा मृत्यू? मनसे आक्रमक अन् पहिली कारवाई

मुंबई तक

navi mumbai municipal hospital negligence : नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील कथित वैद्यकीय हलगर्जीपणाच्या प्रकरणामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय. चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप करत मनसेने आंदोलन सुरु केलंय. सर्व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

navi mumbai municipal hospital negligence
navi mumbai municipal hospital negligence
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबई : 'चुकीचे इंजेक्शन'ने 2 गर्भवती महिलांचा मृत्यू?

point

मनसे आक्रमक अन् पहिली कारवाई

navi mumbai municipal hospital negligence : नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील कथित वैद्यकीय हलगर्जीपणाचे प्रकरण आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरले आहे.  चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचा, तर आणखी एका गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांत या घटना घडल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आरोपांनंतर रुग्णालयाच्या कामकाजावर आणि संबंधित यंत्रणेवर टीकेची झोड उठलीये. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा : नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा नादखुळा टीझर, हिरोच्या भूमिकेनं ताणली उत्सुकता; चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर 

मनसेचं नवी मुंबई महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन 

या कथित वैद्यकीय हलगर्जीपणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले. मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे आपल्या कार्यकर्त्यांसह महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांची भेट घेण्यासाठी महापालिका कार्यालयात पोहोचले. यावेळी चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचा आणि आणखी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात आली.

हेही वाचा : 'तू जाड आहेस, तुला बाळही होत नाही', पतीकडून पत्नीची क्रूरपणे हत्या

हे वाचलं का?