'तू जाड आहेस, तुला बाळही होत नाही', पतीकडून पत्नीची क्रूरपणे हत्या

Crime News : पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार धारवाड जिल्ह्यात घडला. या प्रकरणी पतीसह चार जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'तू जाड आहेस, तुला बाळही होत नाही'

point

पतीकडून पत्नीची क्रूरपणे हत्या

Crime News :  धारवाड जिल्ह्यातील हनसी गावात हुंड्याच्या मागणीवरून 29 वर्षीय विवाहितेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेची ओळख प्रियांका कमलाकर (वय 29) अशी झाली असून, मुख्य आरोपी बसवराज वडार याच्यासह रेणव्वा, सुभाष आणि सिद्धरामेश या तिघांनाही नवलगुंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : "रिअ‍ॅलिटी त्यांनाही माहितीये अन् मलाही..", शिंदेंच्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर फडणवीस स्पष्टच बोलले

विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि बसवराज यांचा विवाह 2024 मध्ये झाला होता. लग्नानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांत त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर दोघांमधील संबंध बिघडू लागले. प्रियांकाच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, बसवराज आणि त्याच्या नातेवाईकांकडून तिचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. माहेरातून अधिक पैसे आणि सोन्याची मागणी केली जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, IMD चा अंदाज

पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती

याशिवाय बसवराज हा प्रियांकाच्या वजनावरून वारंवार तिचा अपमान करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. ती खूप जाड असल्याचे सांगत तिला मूल होऊ शकत नाही किंवा ती मूल जन्माला घालू शकणार नाही, अशा शब्दांत तिचा अवमान केला जात होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. सोमवारी रात्री हनसी गावातील त्यांच्या राहत्या घरी पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्याच वादाच्या वेळी बसवराजने प्रियांकाचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. आरोपींनी हा गुन्हा लपवण्याचाही प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्रियांकाच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर नवलगुंड पोलिसांनी खून आणि हुंडाबळीशी संबंधित कायद्याच्या लागू कलमांनुसार गुन्हा नोंदवला. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या तपासात बसवराज आणि अन्य तिघांचा कथित सहभाग समोर आल्यानंतर पोलिसांनी चौघांनाही अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास नवलगुंड पोलीस करत आहेत.