नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा नादखुळा टीझर, हिरोच्या भूमिकेनं ताणली उत्सुकता; चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर 

मुंबई तक

Khashaba Cinema Teaser : मराठी सिनेमावर मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा 'खाशाबा' नावाचा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचा टीझर आज दि: 2 जुलै 2026 रोजी प्रसारित करण्यात आला आहे. या सिनेमाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा होती, या टिझरमुळे रसिकांची अधिकच अपेक्षा ताणली गेली आहे.

ADVERTISEMENT

Khashaba Cinema Teaser
Khashaba Cinema Teaser
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर अधारित 'खाशाबा'

point

चित्रपटाची तारीख समोर 

Khashaba Cinema Teaser : मराठी सिनेमा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा 'खाशाबा' नावाचा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचा टीझर आज दि: 2 जुलै 2026 रोजी प्रसारित करण्यात आला आहे. या सिनेमाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा होती, या टीझरमुळे रसिकांची अधिकच अपेक्षा ताणली गेली आहे. टीझर पाहिल्यानंतर नागराज मंजुळेच स्वत: केलेला सैराटचा विक्रम मोडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

हे ही वाचा : मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर अधारित 'खाशाबा'

'खाशाबा' हा मराठी सिनेमा कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर अधारित आहे. संबंधित टीझरमध्ये मुख्य नायक हा दोरीवर चढताना दिसतोय. पाखरं हकलून देताना दिसतो, कुस्ती खेळताना दिसतोय, मात्र या टीझरमधून नायकाचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. यामुळे खाशाबाच्या भूमिकेत कोण असणार? असा प्रश्न उपस्थित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. 

टिझरमध्ये कोण कोण दिसतंय? 

चित्रपटाच्या टिझरमध्ये खाशाबा यांची भूमिका केलेला तरुण दिसतोय, मात्र त्याचा चेहरा दाखवण्यात आला नाही. नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, गिरीश कुलकर्णी, ओम भुतकर तसेच इतर कलाकार दिसून येत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे, निर्माते नागराज मंजुळे, ज्योती देशपांडे, गार्गी कुलकर्णी आहेत. या सिनेमाला अजय-अतुल यांनी संगीत दिलेलं आहे. 

हे ही वाचा : सासऱ्याने सुनेला अश्लील व्हिडिओ पाठवले, नंतर पीडितेच्या माहेरी जाऊन धमकावले

चित्रपटाची तारीख समोर 

देश स्वतंत्र्य झाल्यानंतर खाशाबा जाधव या कुस्तीपटूने देशाला पहिलं वहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं. ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील पहिले सुपुत्र अशी त्यांची ओळख आहे. या चित्रपटात खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर हा आधारित सिनेमा आहे. भारतासाठीचा खाशाबांचा अभिमानास्पद प्रवास मोठ्या पडद्यावर लवकरच येणार आहे. चित्रपटाची तारीख देखील समोर आली असून हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

हे वाचलं का?