"देहविक्रीला हे तयारच असतील तर", सचिन अहिरांवर प्रश्न विचारताच राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया
Raj Thackeray on Sachin Ahir : सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर राज ठाकरे यांची तीव्र प्रतिक्रिया. "प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा आहे," म्हणत सध्याच्या राजकारणावरही साधला निशाणा.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"देहविक्रीला हे तयारच असतील तर.."
सचिन अहिरांवर प्रश्न विचारताच राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया
Raj Thackeray on Sachin Ahir, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमदार सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीये. विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सध्याच्या राजकारणावरही कठोर शब्दांत टीका केली. "प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये. विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला हे तयारच असतील तर गिऱ्हाईक आहेतच.", असं पक्षांतराच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
'अशा प्रकारच्या राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप'
यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुळात हे कुठल्या प्रकारचं राजकारण सुरू आहे? असा सवाल करत अशा प्रकारच्या राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकं उन्हा-तान्हात उभे राहून मतदान करतात, मात्र त्यानंतर अशा प्रकारच्या पक्षांतराच्या घटना घडत असल्यामुळे जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्याच्या राजकीय घडामोडींकडे पाहता हा प्रकार लोकशाहीसाठी योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.









